अहिल्यानगर

आ. तनपुरेंच्या विविध गणेश मंडळांना भेटी, बालगणेश मंडळासोबत सेल्फी काढत वाढवला उत्साह

राहुरी | बाळकृष्ण भोसले – आमदार प्राजक्त तनपुरे यांनी शहरातील विविध गणेश मंडळाना भेटी देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेत आरती केली.
गेल्या दोन दिवसापासून आमदार तनपुरे यांनी शहरातील विविध गणेश मंडळाना भेटी देऊन गणपती बाप्पाची आरत्याही केल्या. यात शहराचा मानाचा गणपती, आझाद गणेश मंडळ, मळगंगा गणेश, गजानन तरुण, श्री दत्त गणेश, श्रीराम गणेश, स्वस्तिक गणेश, दत्त मित्रमंडळ, छत्रपती गणेश, महावीर गणेश, लक्ष्मीनगर गणेश, राजवाडा गणेश, श्री गणेश, बुवाशिंद बाबा गणेश, आदि गणेश मंडळाना भेटी देऊन गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांच्या समवेत राहुल शेटे, नंदकुमार तनपुरे, संतोष आघाव, महेश उदावंत, गजानन सातभाई, सूर्यकांत भुजाडी, संजय साळवे, ओंकार कासार, दशरथ पोपळघट, विलास तनपुरे, बाळासाहेब उंडे, प्रकाश भुजाडी, रवींद्र तनपुरे, राजू दुधाडे, मनोज उदावंत, राजेंद्र रणसिंग, नितीन काशीद, जीवन गुलदगड, प्रदीप भट्टड, राजेश अग्रवाल, रिंकू अग्रवाल, सौरभ उंडे, गोविंद दहिवाळकर, ज्ञानेश्वर जगधने, निलेश जगधने, संतोष जगधने, अप्पा मेहेत्रे, राजेंद्र सातभाई, निलेश पांडे, दादू साळवे आदि उपस्थित होते.
बुरुड गल्ली येथील एका लहान मुलांच्या गणेश मंडळातील चिमुकल्यांनी प्राजक्त तनपुरे यांचे बरोबर सेल्फी काढून आनंद घेतला. व त्यांचे समवेत आरती केली.

Related Articles

Back to top button