मुठेवडगांव सोसायटीच्या चेअरमनपदी शकुंतला मुठे यांची निवड
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे – मुठेवाडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे उपाध्यक्ष संपतराव मुठे यांच्या पत्नी शकुंतला संपतराव मुठे यांची बिनविरोध निवड झाली.
मुठेवाडगाव सोसायटीची निवडणूक एक वर्षांपूर्वी झाली होती. त्यावेळी ना. राधाकृष्ण विखे पाटील व चेअरमन भानुदास मुरकुटे गटाला नऊ जागा तर विरोधी आ. लहु कानडे गटाला चार जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी ठरल्याप्रमाणे दरवर्षी चेअरमन व व्हा.चेअरमन पद हे रोटेशन पद्धतीने प्रत्येक संचालकाला देण्याचे ठरले होते त्या नियमाप्रमाणे संस्थेचे चेअरमन डॉ.शंकरराव मुठे यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या चेअरमन पदाचा राजीनामा दिला.
परंतु व्हा.चेअरमन बबन मुठे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही. त्यामुळे आज फक्त चेअरमन पदाची निवड करण्यात आली. यावेळी चेअरमन पदाची सूचना डॉ शंकरराव मुठे मानली तर अनुमोदन संभाजी सारंगधर गोसावी दिले. निवडणूक अधिकारी म्हणून आर.बी.जोशी यांनी पाहिले. यावेळी रविंद्र जाधव, व दत्तात्रय जासूद यांनी त्यांना मदत केली.
यावेळी डॉ शंकरराव मुठे, शिवाजी मुठे, रमेश मुठे, भागवत मुठे, संभाजी गोसावी, सौ द्वारका मुठे व शकुंतला मुठे हे सात संचालक उपस्थित होते. तर विरोधी ६ संचालक अनुपस्थित होते. यावेळी डॉ.मुठे, भाऊसाहेब मुठे, कु.शिवानी मुठे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी शेषराव मुठे, संपतराव मुठे, चांगदेव मुठे, गणेश गोसावी, सुरेश मुठे, लक्ष्मण पाचपिंड, शरद जासूद, तात्यासाहेब चौधरी, मारूती जासूद, रामभाऊ मुठे, रमेश नाईक, जालिंदर मुठे, भाऊसाहेब मुठे, अनिल पाचपिंड, सोम मुठे, संजय लोखंडे, बाळकृष्ण मुठे, रवींद्र मुठे, ज्ञानदेव मुठे, दिनकर मुठे, सचिन मुठे, बाळकृष्ण मुठे, साठे मामा, रामेश्वर बोरुडे, किशोर साठे, अनिल मुठे, रामेश्वर मुठे, जय मुठे, हरिभाऊ मुठे, गोविंद मुठे किरण मुठे, विलास खैरे आदि उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन भिकचंद मुठे यांनी केले तर आभार मल्हारी मुठे यांनी मानले.