छत्रपती संभाजीनगर
मल्टीमनी महिला नागरी पतसंस्थेच्या दुसऱ्या शाखेचे बजाजनगर येथे थाटात उद्घाटन
विलास लाटे | पैठण : मल्टीमनी महिला नागरी पतसंस्थेने गेल्या पाच-सहा वर्षांपूर्वी ढोरकीन येथे पहीली शाखा सुरू केली. अल्पावधीतच पारदर्शक कारभाराच्या जोरावर ग्राहकांचा विश्वास संपादन केला. आता याच पतसंस्थेची दुसरी शाखा सुरू झाली असून रविवारी (दि.१६) रोजी बजाजनगर येथील देवगिरी स्टील समोर दुसऱ्या शाखेचे आ.संजय क्षिरसाठ यांच्या हस्ते थाटात उद्घाटन करण्यात आले.
यावेळी आर.आर. पाटील फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनोद पाटील, जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबसेडे, महाराष्ट्र सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शुभारंभ कार्यक्रम उत्साहात पार पडला. दरम्यान, उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून संस्थेची ध्येय्य, उद्दिष्टे प्रास्ताविकेतून स्पष्ट करत संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तळागाळातील ग्राहकांना आर्थिक सहकार्य मिळेल, त्यांच्या अडी-अडचणी सोडविण्यास मदत होईल. तसेच पतसंस्थेची पुढील वाटचाल सुखकर होण्यासाठी संचालकांनी गुंतवणूकीबरोबर संस्थेच्या प्रगतीसाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा जिल्हा उपनिबंधक दाबसेडे यांनी व्यक्त केली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य व विविध पतसंस्थेचे चेअरमन, उद्योजक, व्यापारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी तसेच नक्षत्र अर्बनचे चेअरमन काकासाहेब भेरे, संचालक, सल्लागार समितीसह आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेच्या अध्यक्षा वैष्णवी लिपाने, उपाध्यक्षा अनिता गारुळे, सचिव कृष्णा लिपाने, संचालक उषा नरवडे, वनिता बोरुडे, सविता सांळूके, सिमा लिपाने, संध्या तारक, आरती राठोड, शारदा तायडे, योगिता भडके आदींनी प्रयत्न केले. या कार्यक्रमास परीसरातील नागरिक, खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.