राजकीय

राज्य काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग उपाध्यक्षपदी लाडे तर महासचिव भोसले, यादव

राहुरी | बाळकृष्ण भोसले – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभाग नवनिर्वाचित पदाधिकार्यांची यादी नुकतीच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेशजी लिलोटीया व प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ हत्तीअंबिरे यांनी जाहीर केली.
नागपूर जिल्ह्यातील राजेश लाडे व बीड जिल्ह्यातील प्रशांत पवार यांची प्रदेश उपाध्यक्ष पदि तर अहमदनगर जिल्ह्यातील संजय भोसले व बंन्टी यादव यांची महासचिव पदी, संभाजीनगर जिल्ह्यातील कृष्णा भंडारे खामगाव, बुलढाणा जिल्ह्यातील गौतम गवई, अमरावती जिल्ह्यातील अभिजित मेश्राम, भुसावळ जिल्ह्यातील प्रवीण सुरवाडे यांची प्रदेश सचिवपदी तर नांदेड जिल्ह्यातील संतोष कांबळे यांची संचालकपदी आदि नियुक्त्या करण्यात आल्या. नव्या कार्यकारिणीत राज्यातून उपाध्यक्षपदी १०, महासचिव पदी २६ तर सचिव १८ व संचालक १३ अशी ६७ जणांची निवड करण्यात आली आहे.
संजय भोसले यांच्या कामाची शैली, क्षमता आणि मनमिळाऊ स्वभाव पाहता काही वर्षांपूर्वी त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या प्रदेश समन्वयकपदी व राहुरी तालुका काँग्रेस कमिटी च्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली होती. आपल्या कार्यकाळात त्यांनी सुशिक्षित युवकांना काँग्रेसकडे वळण्यात महत्वाची भूमिका बजावली. या कामाची पोचपावती म्हणून राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आमदार डॉ.नितीनजी राऊत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश अध्यक्ष शिध्दार्थ हत्तीअंबिरे व प्रदेश उपाध्यक्ष राजेश लाडे यांनी संजय भोसले यांच्यावर आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभाग महासचिव पदाची जबाबदारी सोपवली आहे. 
दरम्यान पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर सोपवलेल्या जबाबदारीला आपण फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांनी पुर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया संजय भोसले यांनी दिली आहे. तर या नियुक्तीबद्दल काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विजय आंभोरे, फोरमचे जयप्रकाश भवसागर, प्रशात शिंदे, संतोषभाऊ आहेरे, शिवाजी बर्डे, काँग्रेसचे राजेंद्र वाघमारे, कार्लस साठे, राहुरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब आढाव पाटील, अनिल पाटील, राहुरी तालुका एस. सी. वि. अध्यक्ष बाळासाहेब सगळगिळे, सुरेश शिरसाठ, दिपक कदम, कमलताई साळवे, प्रकाश भिगारदिवे आदींनी संजय भोसले यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Back to top button