सामाजिक
कैलास पवार यांचे महाराष्ट्रभरातील सामाजिक कार्य गौरवास्पद- अभिनेत्री निवेदिता जोशी/सराफ
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे
: भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्था ही गेल्या अनेक वर्षापासून सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री अलकाताई कुबल यांची प्रेरणा व मार्गदर्शनातून तसेच आदर्श तरुण समाजसेवक संस्थापक अध्यक्ष कैलासजी पवार आणि पदाधिकारी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून महाराष्ट्रभर शैक्षणिक, सामाजिक आणि ग्रामीण भाग, शेतकरी, पाणी, विधवा निराधार महिला, अनाथ मुले, निराधार वृद्ध, तृतीयपंथी समाज, कोरोना काळात अत्यावश्यक लोकांना मदत तसेच विविध आपत्तीच्या काळात देखील राज्यभर असंख्य ठिकाणी उल्लेखनीय कार्य संस्था करत आलेली आहे. हे कार्य खरंच वाखाणण्याजोग आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री निवेदिता ताई जोशी ह्या पुण्यात बालगंधर्व येथे आल्या असता केले. त्याचबरोबर कैलास पवार हे महाराष्ट्रभर करत असलेल्या सामाजिक कार्याला समाजातून मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले पाहिजे असे सांगून पुढील कार्याला नेहमी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली.या भेटी प्रसंगी संस्थेच्या वतीने निवेदिता-ताई जोशी ह्यांचा सन्मान अनिता पवार यांनी केला. यावेळी अनिताताई पवार यांनी म्हटले की निवेदिता-ताई यांचे अभिनय क्षेत्रातील संघर्ष, कार्य आणि योगदान निश्चित इतरांना प्रेरणादायी असल्याचे सांगितले. यावेळी भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासजी पवार यांनी संस्थेच्या माध्यमातून आज पर्यंत केलेल्या संपुर्ण कार्याचा आढावा सविस्तरपणे निवेदिता ताई जोशी सराफ यांना दिला. सदर संस्थेच्या सामाजिक कार्याचा उत्कृष्ट उत्तरोत्तर चढता आलेख पाहता निवेदिता-ताई यांनी समाधान व्यक्त करत पुढे सहकार्याची भावना दाखवली. या सदिच्छा भेटीचे संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांनी जोशी सराफ यांचे अभिनंदन केले आले.