ठळक बातम्या

सातारच्या जान्हवीचा योगविश्वातला सलग तिसरा विश्वविक्रम

 
८ तास १३ मिनिटे २१ सेकंद स्थिर राहून तिसरा विश्वविक्रम करत रचला इतिहास..

विजय चिडे/विशेष प्रतिनिधी : सातारच्या जान्हवी जयप्रकाश इंगळे हिने सुप्त बद्ध कोनासन या आसन मध्ये ८ तास १३ मिनिटे २१ सेकंद स्तब्ध, काहीही हालचाल न करता स्थिर राहून तिसरा नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. या विश्वविक्रमाची नोंद योगा बुक आँफ रेकाँर्ड मध्ये झाली असून नुकतेच कुरियर ने गोल्ड मेडल, सर्टीफिकेट, बँच होल्डर, टी-शर्ट आदी प्राप्त झाले.

जान्हवी या सातारा जिल्ह्यामधून योगविश्वात जागतिक विश्वविक्रम करणार्या पहिल्या युवती आहेत. जान्हवी हिने या आधी सलग ५ तास १ मिनिट १७ सेकंदा स्थिर राहून सिद्धासन आसन मध्ये पहिला विश्वविक्रम केला आहे. तसेच मार्च महिन्या मध्ये महिला दिनाचे औचित्य साधून नऊवारी साडी मध्ये १ तास १९ मिनिटे ३४ सेकंदामध्ये दहा हजार वेळा तितली क्रिया करून दुसरा नवा जागतिक विश्वविक्रम प्रस्थापित करत तो समस्त महिलांना समर्पित केला. नऊवारी साडी मध्ये योगविश्वात विश्वविक्रम करणाऱ्या पहिल्या युवती आहेत. जान्हवी या गेली १४ वर्षे योगसाधना करत असून त्या आयुष मिनिस्ट्री सर्टिफाईड योगा टिचर आहेत. इंटरनँशनल आणि काँर्पोरेट योगा ट्रेनर आहेत. त्याच बरोबर जान्हवी यांनी देशविदेशातील स्पर्धांमध्ये भाग घेऊन प्राविण्य मिळवले आहे. जान्हवी या मँराथाँन रनर हि आहेत. जान्हवी कि योगशाला याच्या त्या संस्थापक असून  सर्ववयोगटासाठी आँनलाईन पद्धतीने सध्या योगवर्ग घेत आहेत. जान्हवी कि योगशाले मार्फत एप्रिल२०२० पासून आज पर्यंत कोरोना काळात सर्वांसाठी आणि कोरोना पेशेंट होम क्वाँरनटाईन, आयसोलेट पेंशेट साठी मोफत योगा सेशन घेत असून याची दखल  लंडन बुक आँफ रेकाँर्डने घेतली असून लंडन बुक आँफ रेकाँर्डने कमिटमेंट सर्टिफिकेट देऊन गौरव केला आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिवसा निमित्त सामाजिक संस्था, एनजिओ, डाँक्टर, पत्रकार, आरोग्यसेवक, नर्स, पोलिस विद्यार्थी आणि पालक अशा एक हजार लोकांना आँनलाईन मोफत योगा सेशन घेऊन योग दिवस साजरा केला. जान्हवी यांना द ग्लोबल आयकाँन आँफ इंडिया, महाराष्ट्र आदर्श युवती क्रिडा रत्न पुरस्कार, द प्राईड आँफ इंडिया, द बेस्ट योगा गुरु, महाराष्ट्र शिवरत्न पुरस्कार  तामिळनाडू योग असोसेशन तर्फे योगाचारिणी अवाँर्ड, इंटरनँशनल इंस्पिरेशन वुमन अवाँर्ड, निशान ए हिंद इंटरनँशनल अवाँर्ड, क्रिडा पुरस्कार, कलाम्स स्पार्कलिंग डायमंड अवाँर्ड, आयुष मिनिस्ट्री वाय.सी.बी. तर्फे प्लाटिनम टिचर अवाँर्ड, वुमन्स पाँवर अँंड वाँईस अवाँर्ड, अमृत संतान इंटरनँशनल अँवार्ड अशा अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे. अमेरिका, लंडन कँनडा येथील संस्थानी देखील त्यांचा गौरव केला आहे. त्याच बरोबर इतर हि विश्वविक्रमा मध्ये त्यांनी भाग घेतला असून हायरेंज बुक, इंटरनँशनल बुक मध्ये नोंद झाली आहे. जान्हवी यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून खा.छ.उदयनराजे भोसले, राजमाता आईसाहेब कल्पनाराजे भोसले, खा.श्रीनिवास पाटील, मा.नगराध्यक्षा रंजना रावत, नगरसेविका दिपाली गोडसे, राजू गोडसे, नगराध्यक्षा माधवी कदम, रचनाताई पाटील, चेतना सिन्हा, कराड नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, कृषी बाजार समितीचे सदस्य राजेंद्र भिलारे, सर सेनापती हंबीरराव मोहिते यांचे वशंज जयाजीराव मोहिते, रविंद्र झुटिंग, राजेंद्र चोरगे, वसंतशेठ जोशी, किशोर शिंदे, दत्ता बनगर, सुनिल काटकर, चंद्रशेखर घोरपडे, योगा बुकचे फाऊंँडर अॅण्ड सिईओ राकेश  भारद्वाज, जिल्हा क्रिडा अधिकारी युवराज नाईक आदी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button