छत्रपती संभाजीनगर
जयेश चव्हाण यांची झोन माॅनिटर पदी निवड
विलास लाटे | पैठण : तालुक्यातील ढोरकीन येथील महावितरणमध्ये कार्यरत असलेले जयेश चव्हाण यांची महावितरण कंपनी परिमंडळ औरंगाबादच्या महाराष्ट्र राज्य विज तांत्रिक कामगार संघटनेच्या झोन मॉनिटर पदी नुकतीच निवड करण्यात आली. त्यांना संघटनेचे सरचिटणीस हाजी सय्यद जहीरुद्दीन यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.
या निवडीचे पारेषण अध्यक्ष आर.पी.थोरात, उपाध्यक्ष कोल्हे मामा, केंद्रीय कोषाध्यक्ष श्रावण कोळनुरकर, राज्य सचिव कैलास गौरकर, झोन सचिव विश्वंभर लोखंडे, सर्कल अध्यक्ष वैभव चव्हाण, सर्कल सचिव प्रकाश सोरमारे, जितेंद्र हाडे, झोन संघटन सचिव संजय चाबुकस्वार, विभागीय अध्यक्ष समीर पहीलवान, विभागीय सचिव गणेश थोरात सह संघटनेच्या सर्व वरिष्ठ पदाधिकारी व सभासद बांधवांनी स्वागत केले.