शिक्षणवारी ज्ञान पंढरी
विद्यार्थ्यांनी राष्ट्रपुरुषांच्या जीवन चरित्राचा डोळसपणे अभ्यास करावा- प्रा.सुदाम चिंचाणे
विलास लाटे/ पैठण : तालुक्यातील बिडकीन येथील सरस्वती भुवन प्रशालेत भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे मुख्याध्यापक मनोहर चित्तोडकर, उपमुख्याध्यापक राजेंद्र कोठावदे, पर्यवेक्षक श्रीमती राजश्री देशपांडे प्रमुख वक्ते प्रा.सुदाम चिंचाणे, मंगला गायधने, ज्ञानेश्वर चाटुपळे, विलास सोनजे, अनुराधा मिरजकर उपस्थित होते.
दरम्यान प्रमुख अतिथी यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी प्रमुख वक्ते प्रा.सुदाम चिंचाणे यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या समग्र जीवन कार्यावर अत्यंत अभ्यासपूर्ण व चौफेर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी राष्ट्रपुरुषांच्या जीवनचरित्राचा डोळसपणे अभ्यास करावा व त्यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांनी दिलेल्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी असे प्रतिपादन केले.
यावेळी उपमुख्याध्यापक राजेंद्र कोठावदे, राजश्री देशपांडे, मंगला गायधने यांनी देखील विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे विमोचन प्रमुख अतिथी यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी अतिशय सुरेल आवाजात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्यावर आधारित गिते, पोवाडे,लावणी सादर केली.
यावेळी हर्षदा चव्हाण, आकांक्षा खोमणे, जयश्री गायकवाड, तेजस्विनी काकडे, कार्तिक हिवाळे, सार्थक गायकवाड, यश काळे, लक्ष्मण कुटे, प्रतिक मुंढे, वैभव वाघ, संकेत वंजारे, अविनाश टेके, सुदामा वीर, भाग्यश्री शिंदे, प्रांजल चोपडे, गितांजली केणेकर, माधुरी गवारे, मयुरी जाधव, अक्षरा कावरे, नंदिनी शेळके, चैताली गजभिव, आदिती फांदाडे, तन्वी शेळके, प्रिया कावरे या विद्यार्थ्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण भाषणे केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणूका गोरे, विनया हिप्परगी, अनुराधा सरोदे यांनी केले तर आभार प्रदर्शन गितांजली केणेकर हिने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती जाफरी, अनुराधा मिरजकर यांनी प्रयत्न केले.