राजकीय
हरेगाव सरपंचपदी उषा कांबळे यांची बिनविरोध
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील हरेगाव येथील ग्रामपंचायत माजी सरपंच यांनी प्रथेप्रमाणे राजीनामा दिल्यावर आज शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच निवडीबाबत सदस्यांची बैठक अशोक कारखाना माजी चेअरमन सुरेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.
सरपंच पदासाठी उषा कांबळे व सौ सीताबाई गायकवाड ह्या दोन महिला इच्छुक होत्या त्यामुळे बहुमत घेण्याचे ठरले. मा.आ.भानुदास मुरकुटे, व युवा नेते करण ससाणे गटाच्या सौ उषाताई कांबळे यांच्या बाजूने १३ सदस्यांपैकी ९ सदस्यांनी संमती दिली. त्यामुळे एकच अर्ज सौ उषा कांबळे यांचा दाखल झाला व त्यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी बी एस वायखिंडे यांनी काम पाहिले व त्यांना सहाय्यक म्हणून ग्रामसेवक प्रदीप आसन यांनी सहकार्य केले.
यावेळी सुरेश गलांडे, उन्दिरगाव उपसरपंच रमेश गायके, हरिगाव तंटामुक्ती अध्यक्ष रसूल पठाण, जेष्ठ नेते विठ्ठल सोमोसे, मा.सरपंच दीपक नवगिरे, सुनील ओहोळ, भाऊसाहेब मुळे, सुनील आव्हाड, सोमनाथ आव्हाड, अमोल श्रीखंडे व सर्व ग्रा.प.सदस्य व उपसरपंच उपस्थित होते. माजी आ.भानुदास मुरकुटे व करण ससाणे यांच्या युतीच्या नूतन सरपंच उषा कांबळे असून त्यांच्या नियुक्तीबद्दल सर्वांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.