छत्रपती संभाजीनगर
आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत स.भु.त भव्य रॅली
विलास लाटे | पैठण : तालुक्यातील बालानगर येथील सरस्वती भुवन प्रशालेच्या विद्यार्थ्यांची भव्य रॅली काढण्यात आली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांनी गावात जनजागृती करण्यासाठी विविध स्वातंत्र्यसेनानी, समाज सुधारक यांच्या वेशभूषा करून “हर घर तिरंगा, हर मन तिरंगा” चा जयघोष करीत सर्वांना स्वातंत्र्याचे महत्व पटवून दिले.
शुक्रवारी आठवडी बाजारासाठी पंचक्रोशीतून आलेल्या नागरिकांनी विद्यार्थ्यांचा उत्साह, भव्य दिव्य रॅली पाहून विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले. मुख्याध्यापक शिरीष मोरे यांच्या मार्गदर्शनात काढलेली ही जनजागृती रॅली यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. गायकवाड, क्रिडाशिक्षक राहूल शिंदे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.