सामाजिक
‘स्व-स्वरुप सांप्रदाय’च्या वतीने जिल्ह्यात दोन रुग्णवाहीकांचे लोकार्पण
विलास लाटे| पैठण : प.पु.जगद्गुरु स्वामी नरेंद्राचार्य महाराज नाणिजधाम प्रणीत स्वस्वरुप सांप्रदाय संस्थानच्या वतीने व प.पू. कानिफनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने गुरुवारी (दि.४) रोजी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये दोन रुग्णवाहीकांचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. करमाड तालुका पूर्व ग्रामीण व लिंबेजळगाव (ता.गंगापूर) या दोन ठिकाणी हा सोहळा संपन्न झाला. सांप्रदायच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्याच अनुशंगाने हा कार्यक्रम घेण्यात आला.
या लोकार्पण सोहळ्यासाठी करमाड पोलीस ठाण्याचे पी.आय. मुरलीधर साहेब, वाळूज पोलीस ठाण्याचे पी.आय. दिलवाले, मुख्य पीठ नाणीजधाम क्षेत्र पुणे सह पीठप्रमुख संजय गाडेकर, मराठवाडा पीठ व्यवस्थापक सुमित लंके, मराठवाडा पीठ महिला निरीक्षक निर्मलाताई खंडागळे, प्रोटोकॉल सेक्रेटरी सुभाष जोजारे, जिल्हा निरीक्षक संदिप थोरात, जिल्हा सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष साहेबराव आहेर, जिल्हा महिला अध्यक्ष निर्मलाताई तरटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान यावेळी मराठवाडा पीठ समितीचे पदाधिकारी, जिल्ह्यातील सर्व प्रबोधनकार, जिल्हा सेवा समिती पदाधिकारी, सर्व तालुका सेवा समिती पदाधिकारी, दोन्ही ऍम्ब्युलन्स चे दक्षता अधिकारी, सर्व आजी माजी पदाधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व भक्त, साधक, शिष्य, हितचिंतक व दोनीही ठिकाणचे ग्रामस्थ व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.