ठळक बातम्या

रामलीला मैदानावर पेन्शन धारकांचा भव्य देशव्यापी मेळावा, व भव्य रॅली

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : देशातील 60 लाख इपीएस 95 पेन्शन धारकांचा पेन्शनवाढीचा प्रश्न अद्याप मार्गी न लागल्याने दिल्ली येथे केंद्रिय भविष्य निधी आयुक्त कार्यालयासमोर 1 ऑगस्ट पासून राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण सुरु झाले होते. देशात सर्व ठिकाणी तालुका, जिल्हा स्तरावर असे आंदोलन सुरु होते दि 7 ऑगस्ट पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण सुरु राहील असा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर देशातील हजारो पेन्शनर दि 8 ऑगस्ट रोजी रामलीला मैदान दिल्ली येथे देशव्यापी मेळाव्याला उपस्थित होते.
देशातील अनेक मान्यवर प्रदेशाध्यक्ष जिल्हाध्यक्ष आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले व आंदोलंनाबद्दल सविस्तर व्यथा मांडल्या. तसेच राष्ट्रीय संघर्ष समिती राष्ट्रीय अध्यक्ष अशोकराव राऊत यांनी सांगितले की, आपल्या सर्वांची एकजूट व अनेक आंदोलने केल्यामुळे व दोन महिन्यापासून चाललेल्या घडामोडीमुळे आपल्याला आंदोलनाला निश्चित यश मिळून लवकरच आनंदाची बातमी मिळेल. आपल्या सरकारकडे साडेचार लाख करोड रु फंडात जमा आहेे. त्यामुळे 90 हजार करोड रु दरवर्षी त्यात वाढ होत असतेे. तो पैसा आपला 65 लाख पेशनधारकांचा आहे. आपल्या मागणीनुसार पेन्शन वाढ झाली नाही तर हा लढा पुढे चालू राहणार आहे. आपण जी कमाल दाखविली ती देशभरात गाजत आहेे. मेळाव्यानंतर दिल्लीत रस्ता रोको आंदोलन व भव्य रॅली काढण्यात आली. त्यात महाराष्ट्राची सुद्धा पेन्शन धारकांची संख्या जास्त होती. पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर व राज्यातील सर्व पदाधिकारी यांनी नेतृत्व केले होतेे.
पेन्शन धारकांना रु 7500/- अधिक महागाई भत्तासह दरमहा पेन्शन मिळावी. वैद्यकीय मोफत सुविधा मिळावी आदी मागण्यासाठी हे आंदोलन झाले. केंद्र सरकार इतर पेन्शन योजना योग्य रीतीने अंमलबजावणी करीत आहे पण इपीएस 95 योजनेबाबत सावत्र व्यवहार करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेबरोबर खा. हेमा मालिनी समवेत शिष्टमंडळाने दोन वेळा सविस्तर सकारात्मक चर्चा झाली व प्रश्न मार्गी लागला जाईल असे आश्वासन दिले व तशा सूचना संबंधित खात्याला, मंत्रालयाला दिल्या.
तरी अद्याप हा प्रश्न प्रलंबित राहिला. सिबिटी च्या 231 व्या बैठकीत काहीही निर्णय झाला नाही ही खेदाची बाब आहे. सहकारी संस्था, बँका, खाजगी उद्योजक, एस टी महामंडळ, शेती महामंडळ, वीज मंडळ आदी संस्थेतील सेवानिवृत्त लाखो पेन्शनर्स यांना दरमहा 1000/-ते 1500/-आसपास पेन्शन मिळते. ती तुटपुंजी आहे. दि 8 ऑगस्ट रोजी रामलीला मैदान येथे झालेल्या देशव्यापी मेळाव्यास नगर जिल्ह्यातून महाराष्ट्रातून हजारो सेवानिवृत्तांनी उपस्थिती दाखवली असे पश्चिम भारत संघटक सचिव सुभाष पोखरकर यांनी सांगितले व संघटना सर्व पदाधिकारी यांनी फार सहकार्य केले.

Related Articles

Back to top button