राजकीय
नवनिर्मित वाघाचा आखाडा ग्रामपंचायतला विकास कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – आ. तनपुरे
राहुरी | बाळकृष्ण भोसले – वाघाचा आखाडा गावास तनपुरे घराण्याचे यापूर्वी जे प्रेम सहकार्य मिळत होते तसेच सहकार्य प्रेम यापुढे ही कायम मिळेल. नवनिर्मित वाघाचा आखाडा ग्रामपंचायतीच्या विकासासाठी निधीची कुठलीही कमतरता पडू देणार नाही असा विश्वास आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिला.
नव्याने स्थापन झालेल्या वाघाचा आखाडा ग्रामपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत विजयी झालेल्या दुर्गामाता जनसेवा मंडळाच्या नवनिर्वाचित सदस्य व सेवा संस्थेच्या नूतन संचालकांचा व त्यांच्या नेत्यांचा आज आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. श्री तनपुरे म्हणाले की वाघाचा आखाडा गावासाठी डॉ दादासाहेब माजी खासदार प्रसाद तनपुरे सभापती अरुण तनपुरे व डॉ सौं उषाताई तनपुरे यांची नेहमीच सहकार्याची भूमिका राहिली आहे. आता या गावासाठी नवीन ग्रामपंचायत स्थापन झाली असून गावाच्या विकासाची जबाबदारी आता माझी आहे. आतापर्यंत जेष्ठ मंडळीचे जे प्रेम होते ते यापुढेही दिले जाईल. व गावासाठी जास्तीत जास्त निधी देऊन विकासासाठी प्रयत्न केले जातील त्यात कुठेही मागे राहणार नाही असा विश्वास नवीन ग्रामपंचायत व सेवा संस्थेच्या सदस्यांना दिला.
यावेळी श्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्य व सेवा संस्थेच्या संचालकांचा सत्कार करण्यात आला. यात सौं. लिलाबाई तनपुरे, सौं निर्मला कटारे, गोरक्षनाथ बर्डे, व प्रशांत सप्रे, तर सेवा संस्थेचे नूतन संचालक राजेंद्र सप्रे, प्रशांत कटारे, किशोर दौंड, सौं विजया कटारे, धनंजय सप्रे, सोपान धसाळ, बाळासाहेब आघाव, लक्ष्मण तनपुरे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नामदेव धसाळ, दत्तात्रय तनपुरे, माणिक कटारे, सतीश वाघ, भाऊराव कटारे, संतोष कटारे, गणेश, आघाव, चंद्रकांत तनपुरे, शरद तनपुरे, अशोक यादव, भाऊसाहेब कटारे, रविंद्र उगलमुगले, सखाराम आघाव, तुषार तनपुरे, अमोल धसाळ, उत्तम वाघ, संदीप सांगळे, बाबासाहेब धसाळ आदी उपस्थित होते.