अहिल्यानगर
स्व.सौ.पुष्पाताई सुकळे यांच्या स्मृतीप्रसंगी वृद्धाश्रमासाठी देणगी प्रेरणादायी – प्राचार्य टी.ई. शेळके
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे – सुखदेव सुकळे यांनी माऊली वृद्धाश्रमाच्या मानवसेवेला पत्नी स्व. सौ. पुष्पाताई सुकळे यांच्या स्मृतीप्रसंगी दिलेली लाख मोलाची समाजकार्याला प्रेरणादायी असल्याचे मत ॲड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे चेअरमन माजी प्राचार्य टी. ई. शेळके यांनी व्यक्त केले.
येथील गुरुमाऊली वृद्धाश्रमात विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे स्व. सौ. पुष्पाताई सुखदेव सुकळे यांच्या स्मृतीनिमित्त वृक्षारोपण, बांधकामासाठी एक लाख रुपयाची देणगी, स्व.सौ.पुष्पाताई सुकळे यांच्या मातोश्रीसाठी श्रीमती इंदुमती बाबुराव बुरकुले यांना 75000 रुपये मदत तसेच सामाजिक प्रबोधन व्याखाने, अन्नदानासाठी देणगी प्रदान असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते, त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य शेळके बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून लोकनियुक्त सरपंच बंडूभाऊ गवारे, माजी प्राचार्य शन्करराव अनारसे, प्राचार्य डॉ.गोरख बारहाते, साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, सुदामराव औताडे, वृद्धाश्रमाचे प्रमुख सुभाष वाघुंडे, सौ. कल्पनाताई वाघुंडे, सुखदेव सुकळे व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते स्व. सौ. पुष्पाताई सुकळे स्मृतीवृक्ष म्हणून आंब्याचे रोप लावण्यात आले. प्रतिमापूजन करण्यात आल्यावर सुभाष वाघुंडे यांनी सर्वांचे स्वागत केले. सुभाष वाघुंडे, सौ. कल्पनाताई वाघुंडे, सुखदेव सुकळे यांना मान्यवरांना बुके, पुस्तके देऊन सत्कार केले. विविध देणगी चेक प्रदान करण्यात आले.अलिबाग येथील शैलेंद्र क्षीरसागर, सौ. विजया क्षीरसागर, तेरेसे अम्मा टेक्कडम यांनी वृद्धाश्रमासाठी रुपये रोख स्वरूपाची मदत केली.
पुणे येथून सुबोध बुरकुले यांना वृद्धाश्रमासाठी एक दिवसाच्या जेवणाची 2000 रुपये रक्कम पाठविली. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य शेळके म्हणाले, खरे तर वृद्धाश्रम ही आपली संस्कृती नाही, प्रत्येक मुलामुलींनी आपल्या आईवडिलांची सेवा केली पाहिजे. आजच्या काळात मात्र मातापित्यांना निराधार व्हावे लागत आहे, अशा कठीण काळात वाघुंडे परिवाराने ऐपत नसताना आपल्याजवळ जे असेल ते खर्च करून हे सेवाकार्य सुरु केले, या मानवतेच्या कार्याला हातभार लावणे ही सुकळेसरांच्या मनाची खरी श्रीमंती आहे, असे कौतुक केले. सरपंच बंडूभाऊ गवारे यांनी सुकळे परिवाराचे सेवाभावी देणगीचे आणि जिव्हाळ्याचे कौतुक केले. वृद्धाश्रमासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करणार आहे, लवकरच बांधकाम सुरु होण्यासाठी मदत करणार असल्याचे सांगितले.
प्राचार्य शन्करराव अनारसे यांनी सुकळेसर यांच्या दानशूर पणाचे आणि पुरोगामी विचारांचे कौतुक केले. शैलेंद्र क्षीरसागर, सौ. उज्ज्वला बुरकूले, वुद्ध बाजीराव मोटे यांच्यासह मान्यवर पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले. सुरेश बुरकुले, बाळासाहेब बुरकुले, संजय बुरकुले, राजेंद्र बुरकुले, सौ. सुरेखा बुरकुले, सुनीता बुरकुले, रेश्मा बुरकुले, सुयोग बुरकुले, संकेत बुरकुले, दिनेश बुरकुले, आरोग्यमित्र भीमराज बागुल, शुभम नाणेकर, रमाकांत क्षीरसागर आदिंनी संयोजन केले. प्रा. शिवाजीराव बारगळ, दिनकरराव पोखरकर, सुरेश गड्डेगुरुजी, श्रीमती कल्याणकर, वाडणकर परिवार, वृद्धाश्रमातील स्त्रीपुरुष, सेवाभावी व्यक्ती उपस्थित होते.
कवयित्री संगीता फासाटे, पत्रकार प्रकाश कुलथे यांनी सुखदेव सुकळे यांच्या सेवाभावी उपक्रमास शुभेच्छा दिल्या. ग्रामपंचायत सदस्य प्रवीण गवारे यांच्या योगदानाबद्दल शुभाष वाघुंडे यांनी सत्कार केला. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी सुखदेव सुकळे यांच्या पुरोगामी विचाराबद्दल विचार व्यक्त करीत उदारमतवादी उक्ती, कृतीचा गौरव केला. स्व.सौ.पुष्पाताई सुकळे यांच्या निधन झाल्यावर अनावश्यक रूढी, परंपरेला फाटा देत मानवता कार्यास देणग्या देऊन खरी स्मृती जपली असे सांगून सूत्रसंचालन केले. सुखदेव सुकळे यांनी स्व. सौ. पुष्पाताई सुकळे यांनी लिहिलेली कविता वाचून सर्वांचे आभार मानले.