राजकीय
तांदुळवाडीच्या नवनिर्वाचित ग्रा.पं. सदस्यांचा आ. तनपुरेंच्या हस्ते सत्कार
राहुरी | बाळकृष्ण भोसले – तांदुळवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापीत नेत्यांना पराभूत करून निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा आज माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात सत्कार केला व नवनिर्वाचित सदस्यांना भावी कार्यास शुभेच्छा देऊन कौतुक केले.
तांदुळवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक दोन दिवसांपूर्वी होऊन या निवडणुकीत सत्ताधारी प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात गावातील सर्व सामान्य जनतेशी नेहमी संपर्क असणारी समविचारी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जय तुळजाभवानी मंडळाची स्थापना केली होती. त्या मंडळाचे ९ उमेदवार विजयी होऊन ग्रामपंचायतीची सत्ता हस्तगत केली असून सेवा संस्थेच्या निवडणुकी पासून प्रस्थापित नेत्यांना धक्के देत ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात घेतली. अशा या निवडून आलेल्या जय तुळजाभवानी मंडळाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ह्यांनी यथोचित सत्कार केला. यावेळी निवडून आलेल्या सदस्यात गणपतराव पेरणे, शिवाजीराव खडके, विक्रम पेरणे, सौ. विमल पेरणे, सौ. शीतल पेरणे, सौ. स्वाती विनीत धसाळ, सौ. गायत्री पेरणे, पत्रकार सय्यद निस्सार यांचा सत्कार केला.
यावेळी नवनिर्वाचित सदस्यांना निवडून आणण्यात ज्यांनी प्रयत्न केले त्यात इंद्रभान पेरणे, विनीत धसाळ, नंदू पेरणे, गोरख खडके, गंगाधर पेरणे, भास्करराव पेरणे, जालिंदर खडके, रामभाऊ पेरणे, भाऊसाहेब तनपुरे, सुधीर धागुडे, चंद्रकांत हंडाळ, शोभाचंद संचेती, भाऊसाहेब पेरणे, उमेश पेरणे, सोमनाथ पेरणे, शामराव पेरणे, प्रल्हाद पेरणे व लक्ष्मणदादा पेरणे आदींचाही सत्कार प्राजक्त तनपुरे यांनी केला. तसेच मागील महिन्यात पार पडलेल्या तांदुळवाडी सेवा संस्थेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित संचालकांचाही सत्कार करण्यात आला. त्यात गणपतराव पेरणे, गहिनीनाथ पेरणे, रवींद्र पेरणे, रेवन्नाथ पेरणे, रावसाहेब पेरणे, सौ. ज्योती पेरणे व सौ. बेबी पेरणे यांचा समावेश होता.