छत्रपती संभाजीनगर
नांदलगाव येथे डाक विभागाच्या वतीने विविध योजनांचे मार्गदर्शन
विलास लाटे | पैठण : तालुक्यातील नांदलगाव येथे नुकतेच लाखेगाव पोस्ट ऑफिस कार्यालय अंतर्गत पाच वर्षापर्यंतच्या मुलां-मुलींचे मोफत आधार कार्ड काढणे व पोस्टाद्वारे राबविण्यात येणाऱ्या सुकन्या समृध्दी ठेव योजना, आवर्ती ठेव योजना, किसान विकास ठेव योजना, नँशनल सर्विस सर्टीफिकेट अशा विविध योजनाची माहिती देण्यात आली.
दरम्यान नांदलगाव येथील अनेक गावकऱ्यांनी सुकन्या समृध्दी योजनेत नोंदणी केली. याप्रसंगी पोस्ट आँफीसचे सहाय्यक अधीक्षक तालीम तडवी, डाक आवेषक श्री. खाडे, नांदलगावचा पोस्टमन श्री. अरगडे, नादंलगावचे सरपंच सिमा चाबुकस्वार, ताराबाई नरवडे, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्य साईनाथ लंभाडे, महेश सुरशे, मुख्याध्यापक श्री. चाबुकस्वार, शालेय समिती अध्यक्ष योगीराज लंभाडे, शिवाजी शिंदे आदींची उपस्थिती होती.