अहिल्यानगर
हरिगाव ग्रामपंचायतने रखडलेली विकास कामे पूर्ण करावी : अस्मिता नवगिरे
श्रीरामपूर/ बाबासाहेब चेडे : ग्रामपंचायत हरिगाव येथील विविध विकास कामे गेल्या एक वर्षापासून रखडलेली आहेत. २०२०-२१ मधील १४ वा वित्त आयोग दलितवस्ती विकास योजना अंतर्गत मंजूर असलेली व इ निविदा झालेली विकास कामे अद्याप पूर्ण झाली नाहीत. अत्यावश्यक सेवेतील कामे इ निविदा प्रक्रियाद्वारे अक्षय दिलीप मांजरे या संस्थेने घेतली होती. त्या संस्थेने हलगर्जीपणा केल्याने महाजनवाडी येथील पाणीपुरवठा विहीर नूतनीकरण करणे, सातवाडी येथे पाण्याची टाकी बांधून पाणी पुरवठा करणे, एक्वादी येथे पाणी पुरवठा पाईप लाईन विस्तार करणे, अशी कामे दीड वर्षापासून न झाल्याने परत गेला आहे.अशा ठेकेदाराला पूर्वीची कामे पूर्ण केल्याशिवाय दुसरी कामे देऊ नयेत अशी मागणी माजी सरपंच अस्मिता नवगिरे यांनी गट विकास अधिकारी श्रीरामपूर, ग्रामविकास मंत्री मुंबई, मुख्य कार्यकारी अधिकारी अहमदनगर, जि.प.कल्याण विभाग, नगर व ग्रामपंचायत हरिगाव यांचेकडे केली आहे. सन २०१८-१९ ला ३ लाख रु पुढील कामाची निविदा करण्याच्या सूचना निर्णय असताना पंचायत समिती स्तरावरून रु ५००००/-इ निविदा करण्याच्या सूचना आल्या. त्याप्रमाणे कामे झाली. राजकीय सूड भावनेतून जिल्हा परिषद, समाज कल्याण विभाग, पंचायत समितीकडे तक्रारी केल्या गेल्या व सहा महिने विकास थांबला. ज्यांनी बी १ निविदा प्रक्रियेला विरोध केला व विकास कामात अडथला आणला तेच प्रतिनिधी आज गावच्या विकासासाठी नाहीत तर स्वार्थासाठी अट्टहास करीत आहेत. कामाचा दर्जा पंचायत समिती अभियंता पाहत असतात. निविदा प्रक्रियेने ठेकेदार शासनाच्या रकमेपेक्षा कमी रकमेत तेच काम ठेकेदार करण्यास तयार होतो. इ निविदाने भ्रष्टाचारास आळां बसतो. गावात न येणाऱ्या वर्तमान पत्रात जाहिरात येते. जाहिरात ही नोटीस बोर्डवर लागली पाहिजे. येथे स्वतंत्र ग्रामसेवक असताना अर्धवेळ ग्रामसेवक मिळतो. १४ व १५ वित्त आयोग मंजूर कामे-तीनवाडी जि प शाळांना वर्ग खोल्यां बांधणे, पत्रे गळतात, शाळा वावरात असताना सर्पांची भीती असते. यास पंचायत समिती, ग्रामपंचायत जबाबदार राहील. एलइडी बल्ब बसविणे, रस्ता कोन्क्रिटीकरण पाणी पुरवठा प्रश्न कायमचा सुटावा, म्हणून सादर केलेल्या प्रस्तावाचा आढावा घेणे ही कामे मागील सरपंच यांचे काळात मंजूर आहेत. अद्याप न झालेने विकास कामे थाांबली आहेत. या निविदाची प्रक्रिया पूर्ण करावी. असे न झाल्यास अवैध मार्गाने काम घेतलेल्या ठेकेदारास काम करू दिले जाणार नाही असा इशाराही निवेदनात माजी लोकनियुक्त सरपंच अस्मिता दीपक नवगिरे यांनी दिला आहे.