छत्रपती संभाजीनगर
गंगापुर तालुक्यातील जोगेश्वरी व लांझी गावातील दलितवस्ती गटाराच्या विळख्यात
विलास लाटे/ पैठण : गंगापुर तालुक्यातील जोगेश्वरी व लांझी या दोन्ही गावातील दलितवस्त्या मधील गल्यांना गटाराचे स्वरुप आले असून या विषयी आदीवासी जमात विकास संस्थेच्या वतीने गंगापुर तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी कार्यालय यांना निवेदन दिले आहे.
जोगेश्वरी व लांझी ही गावं ग्रुप ग्रामपंचायत असुन जोगेश्वरी या गावातील ड्रेनेज लाईन व सांडपाणी मागिल दोन ते तिन वर्षापासून कोणतीही विल्हेवाट न लावत आंबेडकर नगर व एकलव्यनगर या दलीत, आदीवासी वस्तीमध्ये सर्रास सोडले असल्यामुळे येथिल नागरीकांच्या आरोग्यावर तसेच दैनंदिन जनजीवनावर मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत आहे. त्याप्रमाणे लांझी, हिरापुर या ग्रुप ग्रामपंचायत मधिल लांझी या गावातील दलित आदिवासी वस्ती मध्ये रस्त्याला गटाराचे स्वरुप आले आहे.
गंगापुर तालुक्यातील या दोन्ही गावातील दलितवस्त्या मध्ये राहणारे नागरिकांनी वेळोवेळी ग्रामसेवक व सरपंच यांना निवेदन अथवा विनंती करुन देखिल कोणतीही दखल घेतली जात नसल्यामुळे आदिवासी विकास जमात संस्थेचे अध्यक्ष किरण बर्डे, राजु मनोरे, किशोर पवार, संतोष दळे, सुनिल जोगदंड, ॲड. अनिल सपकाळे, संतोष पवार, सचिन गांगुर्डे, विलास गायकवाड, संदिप पवार, भाऊसाहेब बर्डे, गुलाब कवडे, सोमीनाथ गुनाळ, राहुल शिंदे, भाऊसाहेब शिंदे, फकीरचंद वैद्य, नुकूल आडे, विजय गायकवाड, शोभाताई मनोरे, नर्मदा माळी, अलका निकम, जोती खरात, लक्षीमण कवडे, सिंधूबाई माळी, सुरेखा हिवाळे, सुनिता माळी यांच्या शिष्टमंडळाने गंगापुर चे तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले असून येत्या काळात लवकरात लवकर दोन्ही गावातील दलित वस्त्यातील नागरी समस्यांना न्याय द्यावा अशी मागणी दोन्ही गावातील नागरिक करत आहे.