क्रीडा

दिव्यांग क्रिकेट नियामक मंडळाची वार्षिक बैठक संपन्न; मुंबई अपंग क्रिकेट असोसिएशनचे सदस्य पठाण यांची उपस्थिती

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : दिव्यांग क्रिकेट नियामक मंडळाची 24 जुलै 2022 रोजी अमर हॉटेल, आग्रा येथे वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. ज्यामध्ये DCCBI चे अध्यक्ष इक्रांत शर्मा, CEO सुश्री गझल खान, सचिव/संस्थापक हारून रशीद, अध्यक्ष मुकेश कांचन व सदस्य उपस्थित होते.
या बैठकीत 24 राज्यांनी सहभाग घेतला. मुंबई दिव्यांग क्रिकेट असोसिएशनने या वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभाग घेतला आणि मुंबई अपंग क्रिकेट असोसिएशनचे सदस्य जमीर पठाण, उमैदुल्ला खान आणि सुमीत राहिल आदी बैठकीस उपस्थित होते. व दिव्यांग क्रिकेटपटूूंच्या भवितव्यासाठी अध्यक्ष करीम पटेल यांच्याशी चर्चा करून दिव्यांग क्रिकेट अकादमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत सर्व 24 राज्यांचे 4 झोन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई दिव्यांग क्रिकेट असोसिएशन आणि महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, गोवा यांना पश्चिम विभागात स्थान देण्यात आले. सर्व झोनसाठी एका प्रमुखाची निवड करण्यात आली आहे. पश्चिम विभागासाठी उत्तम मिश्रा यांना प्रमुख करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button