अहिल्यानगर
कोंढवड येथील महिला स्वयंसहाय्यता समुहांना प्रशिक्षण
राहुरी : तालुक्यातील कोंढवड येथे महिला स्वयंसहाय्यता समुहांच्या महिलांनी एकत्रित येऊन राजमाता जिजाऊ महिला ग्रामसंघाची स्थापना केली आहे. या ग्रामसंघाला व समुहांना वर्धा जिल्ह्यातून आलेल्या वर्धिनींनी पाच दिवस प्रशिक्षण दिले.
या पाच दिवस चाललेल्या प्रशिक्षण दरम्यान लता ठाकरे, जया नागोशी, अर्चना मसराम या वर्धिनींनी महिलांना उमेद अभियानाचे महत्त्व पटवून देऊन दशसूत्री, ग्रामसंघ महत्त्व, रचना, पदाधिकारी व उपसमित्या, लिपिका, नियमित बैठकांचे महत्व, ग्रामसंघाच्या उपसमित्या गट मूल्यांकन, बँक जोडणी, सुक्ष्म नियोजन आराखडा, सामाजिक मुल्यमापन, संपादणुक समितीने कसे कार्य करावे याविषयी माहिती दिली. महिलांसाठी ग्रामसंघ ही एक मिनी बँक असुन या माध्यमातून मिळणार्या व्हीआरएफ, सीआयएफ, स्टार्टअप निधीविषयी माहिती दिली. या प्रशिक्षणादरम्यान तालुका समन्वयक प्रविण गायकवाड, ब्राम्हणी प्रभाग समन्वयक राणी पगारे यांनी भेट दिली. हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी सीआरपी राधिका मधुकर म्हसे, वैशाली म्हसे, मंगल म्हसे, भारती पवार, उमा म्हसे, रोहिणी म्हसे आदींनी परिश्रम घेतले.
या प्रशिक्षणास मंगल जगन्नाथ म्हसे, कमल म्हसे, अरुणा म्हसे, जिजाबाई म्हसे, सरिता म्हसे, नंदिनी म्हसे, ग्रामपंचायत सदस्य जयश्री म्हसे, शितल औटी, कांता पिसाळ, रेखा म्हसे, निता म्हसे, कावेरी म्हसे, रूपाली म्हसे, रोहिणी म्हसे, उमा पवार, सुप्रिया म्हसे, शोभा म्हसे, जयश्री म्हसे, मीना म्हसे, शांता म्हसे, माया नवले, विमल म्हसे, अस्मिता बोरूडे, मंजुश्री म्हसे, शांता माळी, पुजा म्हसे आदींसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.