छत्रपती संभाजीनगर
माजी आमदार बबनराव वाघचौरे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन
विलास लाटे/ पैठण : तालुक्यातील चितेगाव येथील संत एकनाथ विद्यालयात पैठण तालुक्याचे माजी आमदार कै. बबनराव पाटील वाघचौरे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. याप्रसंगी संत एकनाथ उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानदेव शिंदे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी भादे, रंगनाथ लगाने, विष्णू बोबडे, मच्छिंद्र नागे, दिलीप नरवडे, संजय खैरे, संतोष पाटील, अंबादास कासुळे, संजय जाधव, देवाबा वाकळे, अनिता अनंतवार, स्वाती सुराशे, नंदकुमार गोर्डे, हरिहर आव्हाड, तुषार मिसाळ, बद्रीनाथ शिंदे, मनीषा जाधव, अलका सोनवणे, राजेंद्र रोडी, सचिन आडसरे, विजया चव्हाण, सुचिता जाधव, कलीम पठाण, भाऊसाहेब शेंगुळे, सतीश माळोदे आदींची उपस्थिती होती.