अहिल्यानगर
ग्रामीण भागातील बस सेवा सुरू करा- वंचित बहुजन युवाची मागणी
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : कोराना काळात बंद असलेली तालुका व जिल्हा अंतर्गत ग्रामीण भागातील बस सेवा पूर्ववत करण्याचे निवेदन वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने राहुरी बस स्थानक येथे वाहतुक नियंत्रक यांना देण्यात आलेे.
दैनदिन कामासाठी तसेच शैक्षणिक कामासाठी विद्यार्थी व विद्यार्थीनींना ये जा करण्यासाठी बस सेवा चालु करावी. बस सेवा बंद असल्याने अनेक अडचणी येत आहे, असे निवेदन म्हटले आहे.
यावेळी युवा जिल्हा महासचिव अप्पासाहेब मकासरे, मधुकर साळवे, प्रविण ठुबे ,माजी सरपंच आदिनाथ निकम ,बाबासाहेब शेलार ,समीर जहांगिदार, शांताराम घोरपडे, भैया शेख आदी उपस्थित होते.