छत्रपती संभाजीनगर

लवकरच दिव्यांग निधीचे वाटप करण्याचे बिडीओचे आश्वासन

पाचोड /विजय चिडे : ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर अंध अपंगांसाठी पाच टक्के निधी राखीव असतो. हा पाच टक्के अपंग निधी दिव्यांगांच्या थेट खात्यावर जमा करण्याचे शासनाचे आदेश आहेत. परंतु गेल्या दोन वर्षापासून पैठण तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायतने दिव्यांगांचा पाच टक्के निधी खर्च केला नाही.

तसेच गेल्या वर्षी कोरोनाच्या निमित्ताने काही गावातील ग्रामपंचायतीने दिव्यांगांना किराणा साहित्य वाटप केले. सदरील किराणा साहित्य हे पाच टक्के निधी मधून वाटप केले जाऊ शकत नाही. कारण दिव्यांगाचा निधी हा दिव्यांगांच्या थेट खात्यावरच जमा करण्याचे शासन आदेश असताना वस्तू किंवा साहित्य खरेदी हे नियमात बसत नाही.

या अन्यायाच्या विरोधात राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशानुसार पैठण पंचायत समिती कार्यालयासमोर शुक्रवार दिनांक ३ सप्टेंबर रोजी सर्व प्रकारच्या दिव्यांगांचे तीव्र आंदोलन होणार असल्याने या निवेदनाची दखल घेत पैठण पंचायत समितीचे अधिकारी यांनी १७ सप्टेंबर च्या अगोदर पाच टक्के निधी वाटप करणार असल्याचे आश्वासन दिले.

यावेळी अपंगांनी समाधान मानत, १७ सप्टेंबर नंतर अपंगाचा पाच टक्के निधी वाटप न झाल्यास अधिकार्‍यांच्या तोंडाला काळे फासणार असल्याचे कळवले आहे. यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे, पैठण तालुका अध्यक्ष बाबासाहेब पठाडे, शहराध्यक्ष धोंडीराम सकुंडे, महिला अध्यक्ष सुनिता ताई खरात, यांच्यासह शेकडो अपंगाची उपस्थिती होती.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button