अहिल्यानगर

हरिगाव मतमाउली जन्मदिन उत्साहात संपन्न

श्रीरामपूर[बाबासाहेब चेडे] : तालुक्यातील संत तेरेजा चर्च, हरिगाव मतमाउली भक्तिस्थान येथे पवित्र मारिया [मतमाउली] ८ सप्टेंबर रोजी जन्मदिन असल्याने यात्रापूर्व नोव्हेनाचे ७ वे पुश गुंफताना फा.रॉक अल्फान्सो पुणे यांनी प्रतिपादन केले की आज आपण पवित्र मरीयेचा जन्मदिन मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहोत. प्रारंभी फा. रॉक अल्फान्सो यांनी पवित्र मरीयेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
पवित्र मरीयेच्या जीवनाबद्दल सविस्तर महिमा वर्णन केला.पवित्र कार्यासाठी देवबापाने सर्व स्त्रीयातून तिला निवडले. येशूच्या मारण्याच्या वेळी ती तेथे उपस्थित होती. पवित्र मरीयाला अत्यंत पूज्य मानले जाते. तिला पुत्र होऊन त्याला येशू म्हणतील असा निरोप तिला गाब्रीयल या देवदूताकडून मिळाला होता. बेथलेहेम या गावी येशूचा जन्म झाला. पुढे हेरोद राजाकडून बाल येशूच्या जीवनाला धोका निर्माण झाल्याने ते इजिप्त देशात गेले. काना गावातील लग्न समारंभाला मारिया येशू समवेत गेली होती ती येशुबरोबर जेरुसलेमला आली. तेथून कालवरी टेकडीवर त्याला क्रुसावर खिळेपर्यंत ती तेथेच होती.
मारीयेचे स्वर्गरोहण हे येशू ख्रिस्ताची आई मारिया हिचे पृथ्वीवरील जीवन संपवून सदेह स्वर्गात गेली. पवित्र मरीयेचा नम्रता हा गुण प्रत्येक क्तुम्बत असावा. तिने देवावरची नितांत श्रद्धा कधी कमी पडू दिली नाही. म्हणून तिच्याकडून हा आदर्श व बोध घेतला पाहिजे. येशू ख्रिस्ताला बाळकडू पाजले आहे. तिचा आदर्श आपल्या कुटुंबात घेतला पाहिजे. आपण आदर्श व भक्तीमय जीवन जगले पाहिजे. तिच्यासारखे नम्रतेचे व श्रद्धेचे जीवन जगले पाहिजे. हेच आपल्याला शिकायचे आहे. आदी महिमा वर्णन केला. या नोव्हेनाप्रसंगी प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे, डॉमनिक रोझारिओ, सचिन मुन्तोडे, रिचर्ड अंतोनी सहभागी झाले होते.
नोव्हेना भक्ती झाल्यावर पवित्र मारियाचा वाढदिवस सर्व धर्मगुरू यांच्या उपस्थितीत लहान बालकांच्या हस्ते जन्मदिनाचा केक कापून जन्मदिन साजरा करण्यात आला. जन्मदिनाच्या केकचे आयोजन चिल्ड्रेन ऑफ मदर मेरी ग्रुप हरिगावने केले होते. हा केक मतमाउलीच्या डोंगरासमोर कापण्यात आला. अशा प्रकारे जन्मदिन उत्साहात संपन्न झाला. यात्रा महोत्सव दि ११ सप्टे रोजी ओंनलाईन साजरा होणार असून तो पर्यंत रोजची नोव्हेना भक्ती त्याचे प्रक्षेपण मतमाउली भक्तिस्थान या यु ट्यूब चानेलवर होणार आहे. भाविकांनी घरी राहूनच त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button