म.रा.वी.तांत्रिक कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अधिकारपत्र वाटप
पैठण : महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेची झोन कार्यकारणी ते विभागीय कार्यकारिणीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर संघटनेच्या मध्यवर्ती कार्यालयात संघटनेचे सरचिटणीस सय्यद जहीरुद्दीन यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना अधिकार पत्र देण्यात आले.
यामध्ये केंद्रीय कार्यकारिणी सदस्य पदी जयेश चव्हाण, निमंत्रीत सदस्यपदी अमृत धोकटे, मुस्ताक शेख, झोन संघटन सचिव पदी जितेंद्र हाडे, संजय चाबुकस्वार, ग्रामीण सर्कल अध्यक्ष पदी वैभव चव्हाण, ग्रामिण सर्कल सचिव पदी प्रकाश सोरमारे, यु.के.आरके सर्कल कोषाध्यक्ष, समीर पैलवान ग्रामीण विभाग एक अध्यक्ष, गणेश थोरात ग्रामीण विभाग १ सचिव, सुनील डाके विभागीय संघटन सचिव, राहुल थोरात विभागीय संघटन सचिव यासह आदींची निवड करुन अधिकारपत्र वाटप करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय कार्यकारणी तसेच प्रादेशिक झोन कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.