अहिल्यानगर

“भविष्यकाळ हा युवा पिढीचा आहे” – राजूभाऊ शेटे

शिवसेना वर्धापन दिन उत्साहात साजरा : "आगामी निवडणुकांसाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावं" – देवेंद्र लांबे

राहुरी – “शिवसेना पक्षाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जनतेची कामे झपाट्याने मार्गी लागत आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा शिंदे साहेब पुढे नेत आहेत. आजचा युवक हीच शिवसेनेची खरी ताकद असून, भगवे विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ शेटे यांनी केले आहे.”

शिवसेना पक्षाच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त राहुरी शहरात उत्साहात कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ शेटे, शिवसेना तालुका प्रमुख देवेंद्र लांबे, मधुकर तारडे, ॲड. चंद्रशेखर शेळके, दादासाहेब खाडे, अनिल आढाव, सागर मोरे, अंकुश पवार, विजय तोडमल आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे यांनी आगामी निवडणुकांवर लक्ष केंद्रित करत सांगितले की, “या निवडणुका कार्यकर्त्यांच्या ताकदीवर लढवल्या जातील. सुशिक्षित, गुणवंत तरुणांना संधी मिळवून देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांना उभं करणं आवश्यक आहे. आपली माणसं पुढे आणण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावं.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र उगले यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष धसाळ यांनी केले.

यावेळी संदीप थोपटे, ज्ञानेश्वर धसाळ, भाऊ काळे, शरद डुकरे, राहुल तमनर, दिनकर बाठे, महेंद्र शेळके, किशोर गाडे, गणेश खिलारी, योगेश नालकर, आकाश हरदे, अक्षय शरमाळे, रामेश्वर साळुंखे, अनिरुद्ध मोरे, किशोर पवार, अविनाश क्षिरसागर, पै. सुनील खपके, सुमित गोंदकर, विजय उंडे, बाळासाहेब वाघ, रवींद्र राऊत, रवींद्र पठारे, रमेश आढाव, प्रवीण बाचकर, अशोक कार्ले, नामदेव कोकाटे, नरेंद्र चव्हाण, नितीन कदम, अतुल म्हसे, अभी दांगट, नाना जरे यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button