छत्रपती संभाजीनगर
मानसिंगभाऊ महाविद्यालयात आझादी का अमृत महोत्सव निमित्त रॅली
विलास लाटे | पैठण : तालुक्यातील ढोरकीन येथील मानसिंगभाउ पवार कनिष्ठ महाविद्यालयात आझादी का अमृत महोत्सव “हर घर तिरंगा, घर घर तिरंगा, निमित्त सोमवारी (दि.२२) सकाळी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी रॅलीत महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. दरम्यान प्राचार्य संतोष करांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून रॅलीची सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी गीत गाऊन, तिरंगा झेंडा घेऊन घर-घरांवर झेंडा कसा लावावा या विषयी जनजागृती केली.
याप्रसंगी सरपंच वैभव मुळे, श्रीमती नवपुते, आशा नारळे, श्रीमती खिल्लारे, श्री डव्हळे, श्री. जगरवाल, श्री. पलोदकर, श्री. राठोड, श्री. कुलकर्णी, श्री मगरे, श्री ढाकणे यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.