अहिल्यानगर
श्री संत सावता माळी युवक संघटनेच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबविण्याचे आवाहन
राहुरी | बाळकृष्ण भोसले – भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे. त्यांचाच भाग म्हणून अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघटनेच्या वतीने देशातील सर्व जनतेमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी प्रत्येक घरात स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनी नागरिकांनी १३ ते१५ ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावावा असे आवाहन करण्यात आले आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड, अ.नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष अशोक तुपे, राज्य सोशल मीडिया प्रमुख दिपक साखरे, वांबोरी शहराध्यक्ष सुनिल शिंदे, राहुरी तालुका सचिव भरत सत्रे, वांबोरी उपाध्यक्ष बाळासाहेब सत्रे आदींनी या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन केले. यावेळी संतोष विधाटे, सोमनाथ कुऱ्हे, कमलेश सत्रे, बापुसाहेब दुधाडे, विजय शिंदे, संतोष शिंदे, जुनेद कुरेशी, भैया मन्सूरी, हैदर मन्सूरी, रामकिसन कुऱ्हे, संजय मिरीकर, धाडगे, यश साखरे चेतन्य व्यवहारे उपस्थित होते.