चार भिंतींचे मंदिरे उभारण्यापेक्षा दोन पायाचे चालते बोलते मंदिरे उभी करा – प्रभावती घोगरे
कोपरगाव- शिर्डी - अहमदनगर रस्त्यावरील साईभक्तांच्या मुत्युच्यां जबाबदारीचं काय?
शिर्डी : साई देवस्थानाची ख्याती जगभरात आहे. साई बाबांनी हयातीत भुकेलेल्यांना अन्न, तहनलेल्यांना पाणी, दुखिजनांना दवा, आलेल्यांना ज्ञानार्जन केले. चार भिंतीचे मंदिरे बांधने हे त्यांचे कार्य नसुन दोन पायांची चालती बोलती मंदिरे उभी करणे हेच त्यांचे मुख्य कार्य असल्याने तेच होणे अपेक्षीत आहे, अशी मागणी कृषीभुषण प्रभावती जनार्दन घोगरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे साईसंस्थानला केली आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात त्या पुढे म्हणाल्या, आज जगाच्या कानाकोपऱ्यातुन अनेक भक्त शिर्डीत साईदर्शनासाठी येत असतात. त्यांची सुख सुविधा ठेवणे हे साई संस्थानचे आद्यकर्तव्य आहे. संस्थानच्या माध्यमातुन सर्व प्रकारच्या सुख सुविधायुक्त आरोग्य सेवा, सर्व प्रकारचे शैक्षणिक संकुल, अन्नक्षत्र, भक्तनिवास, साईभक्तांना रात्रंदिवस सेवा देणारी कर्मचारी, या साईभक्तांच्या मुलभुत गरजा दर्जेदार कशा देता येईल याकडे संस्थानने भर दिला पाहिजे. साई कार्याचा प्रचार प्रसार तर नक्कीच झाला पाहिजे. मात्र गावोगावी चार भिंतीचे मंदिरे बांधुन साईचा प्रचार प्रसार करण्यापेक्षा गावोगावी दोन पायाची चालती बोलती मंदिरे कशी उभी करता येईल, यातुन समाजात जनजागृती होऊन बाबांचे कार्य तळागाळापर्यंत पोहचलं याकडे संस्थानने भर द्यावा. साईबाबांनी हयातीत चालती बोलती दोन पायांची मंदिरे उभी केली, हेच त्याचे मुख्य कार्य होते.
साईभक्तांची शिर्डीत साईदर्शनकरिता येण्यासाठी मोठी गैरसोय होत आहे. शिर्डी – नगर व शिर्डी – कोपरगाव या रस्त्याची झालेली मोठी दुर्दशा, त्यामुळे झालेले मोठे आपघात व त्यात गेलेले शकडो साईभक्तांचे प्राण हा मोठा चिंतेचा विषय आहे. मात्र याकडे सविस्तरपणे दुर्लक्ष केले जाते. याचा विचार ना साई संस्थान करतयं, ना राज्यकर्ते करतयं. त्यातुन अपघातातील अनेक साईभक्तांचे कुटुंब उध्वस्त झाले. याकडं कधी साईसंस्थानने डोकवलं कावो, नाही कारण हा रस्ता साईभक्त वापरत नसावे. अनेक साईभक्त या रस्त्याच्या दुर्दशेचे बळी ठरले आहेत. हा रस्ता तातडीने दूरुस्त करावा असे साधे पत्र आजपर्यंत साईसंस्थानने शासनाला दिले तरी का? साईभक्तांच्या सुखकर प्रवासाची नैतिक जबाबदारी साईसंस्थानची नाही का? हा खुप मोठा गंभीर विषय आहे. तेव्हा साईसंस्थानने लोकहितार्थ, लोकाभिमुख व जे साईबाबांनी हयातीत केले, तेचं कार्य व शिकवणुकीची जतन करुन कार्य करावे, अशी भावना प्रभावती घोगरे यांनी व्यक्त केली.