धार्मिक

कृष्ण हा काळा आहे काळा रंग अकर्षन करतो – महंत रामगिरी महाराज

रामगिरी महाराजांकडुन जुन्या आठवणींना उजाळा

लोणी : या जगाच्या निर्मितीत कृष्ण अवताराचं अनन्य साधारण महत्व आहे. लोणी खुर्द येथील ५१ व्या योगिराज सद्गुरू गंगागिरी महाराज अखंड हरिनाम काल्याच्या कीर्तन प्रसंगी सरलाबेटाचे महंत रामगिरी महाराज बोलत होते. ते पुढे म्हणाले कृष्ण हा काळा आहे. काळा रंग हा अकर्षन करतो. काळा व शुभ्र कापड जर सुकायला टाकले तर काळे कापड लवकर सुकते. कृ – चिंत्तेचा अकर्षन करतो तो कृष्ण तसेच आपल्या भारतीय संस्कृतीत शेंडी ठेवण्याची परंपरा आहे. परंतु ती गाईच्या खुरा ऐवढी ठेवली पाहीजे.

लोणी खुर्द गावातील हा सप्ताह सन १९७२ पासुन सुरु झालेला आहे. गंगागिरी महाराज संस्थान सरलाबेट चे तत्कालीन मठाधिपती गुरुवर्य नारायणगिरी महाराजांनी देशात दुष्काळ पडलेला असताना अन्न धान्याचा मोठा तुटवडा होता त्याच दुष्काळी वर्षी सरला बेटाचा सप्ताह करण्याची मोठी जबाबदारी होती. त्यावेळी गंगागिरी महाराज संस्थान सरलाबेटाचे तत्कालीन विश्वस्त मठाधिपती नारायणगिरी महाराज यांचे अतिशय विश्वासु सहकारी भुमिपुत्र कै मा.आ. चंद्रभान घोगरे यांच्यावर सप्ताह करण्याची सोपवली. गुरुवर्य नारायणगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने कै चंद्रभान घोगरे यांनी लोणी खुर्द गावातील ग्रामस्थांची बैठक घेऊन सप्ताह करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी गावातील सर्व ग्रामस्थांनी एकजुटीने आपल्या शेतजमिनीवर चारा तगाई चे कर्ज काढुन लोणी खुर्द गावात दुष्काळात योगिराज गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह करण्यात आला.

नुकताच झालेला १७६ वा योगिराज सद्गुरु गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाच्या इतिहासात कर्ज काढुन योगिराज गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह सन १९७२ मध्ये दुष्काळात १२५ वा सप्ताह करणारं लोणी खुर्द गाव म्हणून गुरुवर्य नारायणगिरी महाराजांनी खुप प्रेम दिले. योगायोगाने गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने पुढे ते चारा तगाई कर्ज शासनाकडुन माफ करण्यात आले. तेव्हापासुन लोणी खुर्द गावात ही सप्ताह परंपरा अव्याहतपणे सुरु असुन आज त्यास ५१ वर्ष झालेली आहे. या सप्ताहात बेटावर येण्याच्या अगोदर कृष्णजन्मष्टमी च्या कीर्तनाला आम्ही असायचो असे रामगिरी महाराजांनी सांगताना जुन्या आठवणींना उजाळा दिला.

सकाळी गावात सनई चौघाड्याची सवाद्य, रयतच्या विद्यार्थी चे लेझीम पथकासह ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथाची भव्यदिव्य मिरवणुक काढण्यात आली. सदर सप्ताहाचे नियोजन सरपंच जनार्दन घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी खु ग्रा.प चे उपसरपंच, सर्व सदस्य, लोणी खुर्द सेवा संस्था चेअरमन, व्हा चेअरमन, संचालक मंडळ, यात्रा कमिटी अध्यक्ष, भजनी मंडळ, महिला मंडळ, तरुण मंडळ, भक्त मंडळ, रयत शिक्षण संकुल लोणी खुर्द यांनी विषेश योगदान दिले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button