अहिल्यानगर
विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करणे गरजे – अशोकराव तुपे
अहमदनगर : गोरे डेंटल हॉस्पिटल माळीवाडा चे संचालक डॉ सुदर्शन गोरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक व समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त जनकल्याण रक्तपेढी यांच्या संयोजनाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले. तसेच 11 ऑक्टोबर हा दिवस पुस्तक संवाद दिन म्हणून साजरा करण्यात आला. याप्रसंगी पुष्पगुच्छ, हार, शाल, केक या सर्वांचा खर्च टाळून पुस्तके भेट देण्यात आली. विविध चरित्रात्मक पुस्तके व अध्यात्मिक पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी भगवानराव फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे, दत्ताभाऊ जाधव, धनंजय जाधव, अशोकराव तुपे, अमोल लोंढे, भास्कर लोंढे, माऊली गायकवाड, अनिल ईवळे, श्री औटी, डॉ शिवराज गुंजाळ, डॉ प्रशांत तुवर, राहुल बोरुडे, राहुल कदम, सुनील कर्डिले, किरण जावळे, दीपक खेडकर, हजारे, श्री पुंड, बाळासाहेब भुजबळ, कैलास दळवी, उपलब्धराजेंद्र पडोळे, सागावकर, रमेश सानप, सुनील भिंगारे, आदेश जाधव, श्री लोखंडे, ऋषिकेश इवळे आदींसह समाजातील सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. जलकल्याण रक्तपेढीचे डॉ मढीकर व डॉ झेंडे यांनी रक्तपेढी तर्फे सर्व नियोजन केले. अशोकराव तुपे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. केतन गोरे यांनी कार्यक्रमाची नियोजन करून आभर मानले.