स्वराज प्रमुख छत्रपती संभाजी महाराज यांचा नाशिक दौरा
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : स्वराज प्रमुख छ्त्रपती संभाजी महाराज येत्या दि. २४ व २५ जून रोजी नाशिक दौऱ्यावर येणार असून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्वराज प्रदेश संपर्क प्रमुख करण गायकर यांनी दिली.
शनिवार दि. २४ जून रोजी छत्रपती संभाजी महाराज यांचे नाशिक शहरात सकाळी ११ वाजता आगमन होणार असून सायंकाळी ४ वा. स्वराज पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा यश लॉन्स नांदूर नका नाशिक येथे होणार आहे. दि. २५ जून रोजी सकाळी १० वाजता रावसाहेब थोरात सभागृह गंगापूर नाका नाशिक येथे छत्रपती शाहू महाराज स्मृति शताब्दी समितीच्या बक्षीस वितरण कार्यक्रमास व मविप्र संस्था गौरव छत्रपती शाहू महाराज जीवन विचार व्याख्यानमाला कार्यक्रमास उपस्थिती राहणार आहेत.
तसेच दु. १ वाजता कालिदास कला मंदिर नाशिक येथे राजश्री शाहू महाराज विचार जागर स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. तरी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.