श्रीरामपूर बाजार समितीचे मोकळा कांदा मार्केट सोमवार ते शुक्रवार सुरू राहणार
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात मागील वर्षी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मोकळा कांदा मार्केट सुरू करण्यात आले होते. श्रीरामपूर बाजार समितीच्या मोकळा कांदा मार्केटला श्रीरामपूर, वैजापूर, गंगापूर, राहता, राहुरी सह परिसरातील तालुक्यातील शेतकऱ्यांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शेतकऱ्यांमधून बाजार समितीकडे संपूर्ण आठवडाभर मोकळा कांदा मार्केट सुरू करण्याची मागणी केली जात होती. या मागणीची दखल घेत श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने मोकळा कांदा मार्केट सोमवार ते शुक्रवार सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती श्रीरामपूर बाजार समितीचे प्र.सचिव साहेबराव वाबळे यांनी दिली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील सोमवार ते शुक्रवार पाच दिवस मोकळा कांदा मार्केटचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासक दीपक नागरगोजे व प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी केले आहे.