अहिल्यानगर

दिव्यांगांचे पुनर्वसन अभिमानाचा उपक्रम- सुकळे

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : दिव्यांग व्यक्तीच्या जीवनात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य विषयक कार्यक्रमांचे आयोजन करून दिव्यांगाचे सर्वांगीण पुनर्वसन करण्याचे महनीय कार्य मागील 26 वर्षांपासून अपंग सामाजिक विकास संस्था व आसान दिव्यांग संघटना श्रीरामपूरात करत आहेत, हि श्रीरामपूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

महामानव बाबा आमटे यांच्या प्रमाणे दिव्यांग व्यक्तीच्या जीवनात प्रकाश टाकण्याचे अतुलनीय दिशादर्शक कार्य श्रीरामपूरात होत आहे. दिव्यांग व्यक्तीच्या जीवनातील वैवाहिक समस्या सोडविण्यासाठी 18 वर्षांपासून दिव्यांग वधूवर परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करुन 283 दिव्यांग व्यक्तींचे विवाह यशस्वी करण्यात संयोजकांना यशप्राप्ती झाली हि अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन दिव्यांग विवाह सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे सचिव सुखदेव सुकळे यांनी केले.

अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर व आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने सहर्षा हाॅल बोंबले पाटील नगर याठिकाणी दिव्यांग विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उदघाटन माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी, श्रीरामपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक गाडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.प्रा.बाबुराव उपाध्ये, उपाध्यापिका सुनिता नागरे, शब्दगंध साहित्य परिषदेचे सचिव सुनील गोसावी, श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गिरीधर आसने, बौद्धाचार्य सौ.सरिता सावंत, माजी अध्यक्ष आय्याजभाई तांबोळी, अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे व सचिव वर्षा गायकवाड, आसान दिव्यांग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुश्ताकभाई तांबोळी, कलिम शेख यांच्या हस्ते तुळशी वृंदावनला पाणी अर्पण करून करण्यात आली. पर्यावरण समृद्धीचा संदेश देण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवरांचा वैचारिक पुस्तके भेट देऊन वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याचा संकल्प संयोजकांनी केला.

श्रीनिवास बिहाणी यांनी म्हटले की, वर्षभर संस्था व संघटनेच्या वतीने दिव्यांग व्यक्तींच्या गरजा ओळखून उपक्रमाचे आयोजन करून दिव्यांगाना दिशा देण्याचे काम केले जाते, हे नक्कीच प्रेरणादायी आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी संघटनेच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी संस्था व संघटनाच्या उपक्रमाचे विशेष कौतुक करून दिव्यांग वधूवरांना शुभाशिर्वाद दिले. सदर विवाह सोहळा निमित्ताने उपस्थित मुलांमुलींचे दिव्यांग व नाॅर्मल चार जोडपेचे विवाह जमविण्यात संयोजक संजय साळवे यांना यश प्राप्त झाले. याप्रसंगी अनेक पालकांनी, नातेवाईकांनी संयोजन समितीला धन्यवाद दिले.

विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रमुख संयोजक संजय साळवे, वर्षा गायकवाड, मुश्ताकभाई तांबोळी, नवनाथ कर्डिले, सौ.साधना चुडिवाल, राजेंद्र रहिंज, गंगाधर सोमवंशी, दत्तात्रय चव्हाण, पुजा आढाव, सुधाकर बागुल, सौ.विमल जाधव, सुनिल कानडे, महेंद्र दिवे, कु.सहर्षा साळवे यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय साळवे यांनी केले तर सुत्रसंचालन मुश्ताकभाई तांबोळी यांनी केले. आभार वर्षा गायकवाड यांनी मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button