अहिल्यानगर

कृषि महाविद्यालय, हाळगाव येथे 63 वा महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय, हाळगांव हे घोषीत झाल्यापासून आत्तापर्यंत महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरात कार्यरत होते.

अधिष्ठाता डॉ. बापुसाहेब भाकरे व विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके यांच्या प्रयत्नामुळे सदरचे कृषि महाविद्यालय हाळगांव येथे कार्यरत करण्यासाठी आवश्यक त्या सोई सुविधा पूर्ण करण्यात आल्या. त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय हाळगाव येथे कार्यान्वीत झाले. या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये सोमवार, दिनांक 1 मे, 2023 रोजी 63 वा महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाप्रसंगी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आपल्या भाषणात मार्गदर्शन करताना डॉ. ससाणे यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिनाचे महत्व समजावून सांगितले. स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्मितीमध्ये अमर झालेल्या थोर महात्म्याचे पुण्यस्मरण करून महाराष्ट्राची अस्मिता, संस्कृती अबाधित राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करण्याचे सुचित केले.

सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. चारूदत्त चौधरी, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सखेचंद अनारसे, व शारीरिक शिक्षण निदेशक डॉ. राहुल विधाते यांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमासाठी कृषि महाविद्यालयाचे प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button