राजकीय
हिरडगाव सोसायटीत शिपाई म्हणून काम पाहिलेले मोरे झाले व्हा. चेअरमन पदी विराजमान
श्रीगोंदा/ सुभाष दरेकर : तालुक्यातील हिरडगाव सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडून चेअरमन पदी झुंबरराव दरेकर यांची बिनविरोध तर व्हाॅयचेअरमन पदी ज्यांनी हिरडगाव सेवा सोसायटीमध्ये तीस वर्ष शिपाई या पदावर राहून सोसायटीमध्ये स्वच्छतेपासुन सर्वच कामे केली, अशा सर्वसाधारण गरीब कुटुंबातील देवराव मोरे ऊर्फ तात्या यांची निवड झाली.
देवराव मोरे ऊर्फ तात्या यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला व मोरे बिनविरोध निवडून आले. आज चेअरमन व्हा. चेअरमन निवडीच्या वेळी चेअरमन पदी झुंबरराव दरेकर यांची बिनविरोध निवड झाली. परंतु, व्हा. चेअरमन पदासाठी रस्सीखेच सुरू झाली व चिठ्ठ्या टाकण्याची वेळ आली. या राजकीय डावपेचात मोरे यांची चिठ्ठी निघाली. सोसायटीत निस्वार्थपणे केलेल्या सेवेचे फळ मिळाल्याचे मोरे यांच्या निवडीनंतर ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.