ठळक बातम्या
भाऊबंदकीच्या वादातून मुसमाडे वस्ती शाळेचा बंद झालेला रस्ता सुरु झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद बहरला
• तोडगा काढण्यासाठी राञी उशिरा पर्यंत बैठक
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी : येथिल मुसमाडे वस्तीवरील जिल्हा परीषदेच्या शाळेचा अडविलेला रस्ता वहिवाटीस मोकळा करुन नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी मार्ग काढल्याने मंगळवारी शाळा भरल्या नंतर चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसडून वाहत होता. सोमवारी राञी उशिरा पर्यंत बैठक चालू होती. या बैठकीत रस्त्याचा प्रश्न सुटे पर्यंत रस्ता चालू ठेवण्याचा निर्णय दोन्ही भाऊबंदकीने नगराध्यक्ष कदम यांना आश्वासन दिले. अखेर कोरोना महामारीत दोन वर्षा पासुन बंद असलेली शाळा सुरु झाल्याने पालकांसह विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
जिल्हा परीषद शाळा गुरवार दि.11 नोव्हेंबर रोजी सुरु झाली. दोन वर्षा पासुन बंद असलेली शाळा सुरु होणार पालकांसह विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला होता. परंतू मुसमाडे वस्तीवरील जिल्हा परीषद मराठी शाळेचा रस्ता येथिल भाऊबंदकीच्या वादातून माधव दगडू मुसमाडे यांनी बंद केला होता. पहिल्याच दिवशी शाळेत आलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळेचा रस्ता बंद केल्याचे दिसल्याने शाळेचा आनंद असणाऱ्या चेहऱ्यावर दुःखाचे सावट पसरले. रस्ता चालू करणार नसल्याचे समजल्यावर दुःखद अंतकरणाने चिमुकले विद्यार्थी पालकांसह परत घरी परतले. पालक व मुख्याध्यापक यांनी शाळेचा रस्ता खुला करुन मिळावा यासाठी जिल्हाधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, गटशिक्षणधिकारी आदींना निवेदन देवून मागणी केली. संतप्त पालकांनी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या कानावर रस्ताबंद केल्याची माहिती दिली.
नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांनी सदर ठिकाणी सोमवारी सायंकाळी प्रत्यक्ष पाहणी केली. भाऊबंदकीच्या वादातील दोन्ही कुटुंबाचे नगराध्यक्ष कदम यांनी म्हणणे ऐकून घेतले. राञी उशिरा पर्यंत हि बैठक चालू होती. दोन्ही बाजुच्या तक्रारी समजावून घेतल्या नंतर सर्वानुमते त्यावर निर्णय घेण्यात आला की, दोन्ही गटांची मोजणी प्रकिया करून सामाईक बांधावरून रस्ता काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यास दोन्ही मुसमाडे कुटुंबाने संमती दर्शविली आहे. या बैठकीस माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश संसारे, भीमराज मुसमाडे, माजी नगरसेवक अमोल कदम, डॉ.संदीप मुसमाडे व संतप्त पालक उपस्थित होते. तूर्तास सदरचा रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आसल्याने चिमुकल्यांना पुन्हा शाळेचा आनंद मिळणार असल्याचे त्यांच्या बोलक्या चेहऱ्यावरुन दिसत होते. मंगळवारी नियमित प्रमाणे शाळा सुरु झाल्याने पालकांसह विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसडून वाहत होता.
ना खुर्ची… ना मान सन्मान… फक्त प्रश्न सोडवा…देवळाली प्रवरा शहरातील मुसमाडे वस्ती शाळेचा रस्ता बंद करण्यात आला असल्याचे पालकांकडून समजल्या नंतर नगर पालिकेची व इतर कामे दिवसभर उरकून सायंकाळी 5 ते 6 च्या दरम्यान नगराध्यक्ष कदम आपल्या सहकाऱ्यां समवेत मुसमाडे वस्ती शाळा येथे गेले. पालक व वाद असलेले दोन्ही भाऊबंदाना शाळेच्या प्रांगणात बोलवले. उपस्थित सर्वांन बरोबर शाळेच्या प्रांगणात भारतीय बैठक मारुन सर्वांची भुमिका समजावून घेतली. मला बसण्यास खुर्ची लागत नाही…ना तुमच्या कडून मान सन्मान पाहिजे. चिमुकल्यांचा रस्त्याचा प्रश्न सोडवणे महत्वाचे बैठकीत चर्चा करा मार्ग काढा मला श्रेय घ्यायचे नाही. परंतू चिमुकल्यांचा शाळेचा प्रश्न सुटला पाहिजे. असाच सुर नगराध्यक्ष कदम यांचा दिसत होता.