अहिल्यानगर
सावित्रीमाई फुले बहुजनांच्या माता – महाराष्ट्र भूषन लोकनेते सचिन गुलदगड
क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमीत्त डॉ. गडगे हॉस्पिटल व साई एशियन नोबेल हॉस्पीटलच्या वतीने मोफत सर्व रोग निदान शिबीर संपन्न
नागापुर – क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमीत्त डॉ. गडगे हॉस्पिटल व साई एशियन नोबेल हॉस्पिटलच्या वतीने मोफत सर्व रोग निदान शिबीराचे एमायडीसी येथे गडगे हॉस्पीटल येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रथमतः क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंच्या व महात्मा जोतिबा फुलेंच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पन करुन अभिवादन करण्यात आले.
शिबीराच्या उद्धाटनप्रसंगी श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषन लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड, उद्योजक भैरवनाथ आदलिंग, डॉ. संजीव गडगे, प्रबोध तुपे, सागर चौरे, साळवे मामा तसेच नवनागापुर एमायडीसी ग्रांमपंचायतचे आजी माजी सरपंच, सदस्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना महाराष्ट्र भूषन लोकनेते सचिन गुलदगड यांनी क्रांतीज्योती सावित्रीमाईंच्या जीवनावर भाषणातून प्रकाश टाकत सावित्रीमाई फुले या बहुजनांच्या माता आहेत. त्यामुळे सर्वच स्तरातून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी होत आहे, असे सांगितले. शिबीराचे मुख्य आयोजक डॉ. संजीव गडगे यांनी सर्वांचे स्वागत केले तर डॉ. सौ. गडगे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी एमायडीसी, नवनागापुर तसेच वडगाव गुप्ता येथील बहुसंख्य रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.