अहिल्यानगर
शिरसगावात बिबट्याचा संचार; वनखात्याने पिंजरा लावावा ग्रामस्थांची मागणी
श्रीरामपूर [बाबासाहेब चेडे] : तालुक्यातील शिरसगाव येथे एकाच ठराविक ठिकाणी वारंवार बिबट्या वास्तव्य करताना दिसत असल्याने शेतकरी, ग्रामस्थ भयभीत झाले आहे. कधी उसात तर कधी आंब्याच्या झाडाखाली बिबट्या बसलेला सुभाष बकाल, रमेश बकाल व अनेकांनी पहिला. त्यामुळे कोणी भीतीने कामाच्या ठिकाणी जायला तयार नाही. हा बिबट्या चार दोन दिवस दुसरीकडे जाऊन परत याच नेहरूनाना बकाल यांच्या वस्तीजवळील परिसरात दिसतो.
तीन-चार दिवसापासून बिबट्या दिसतो पण कोणी गांभीर्याने घेईना. वनविभागाच्या कर्मचारीला फोन केला तर फोन घेत नाही. याची गांभीर्याने दखल घेऊन श्रीरामपूर लोकप्रतिनिधी आ. लहू कानडे यांनी वनविभागाशी संपर्क साधून त्वरित शिरसगाव येथे पिंजरा लावावा व बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी ग्रामस्थ यांनी केली आहे. आता शाळा सुरु झाल्या आहेत. पावसाची झिमझिम थांबली आहे. सोयाबीन आदी पिके काढण्याची लगबग सुरु असताना कामगार भीतीने येत नाहीत. तरी तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी होत आहे.