शिक्षणवारी ज्ञान पंढरी
सात्रळ महाविद्यालयात शुक्रवारी ‘परीक्षा पे चर्चा’ पंतप्रधान मोदींचे ऑनलाईन मार्गदर्शन
राहुरी | बाळकृष्ण भोसले : वर्तमानकाळात विद्यार्थी विविध विद्याशाखांच्या परीक्षेला सामोरे जात आहेत. परीक्षेच्या सर्व वातावरणातून विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र शासन, शिक्षण संचालक (उच्च शिक्षण), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व सात्रळ महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने विद्यार्थी, पालक, शिक्षकासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘परीक्षा पे चर्चा’ याविषयीवर ऑनलाईन मार्गदर्शन आयोजित आयोजन करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) प्रभाकर माणिकराव डोंगरे यांनी दिली.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सात्रळ येथील पद्मभूषण लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा शैक्षणिक संकुलाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सेमिनार हॉलमध्ये शुक्रवार, दि. २७ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११:०० वा. वरील व्याख्यान दृकश्राव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले आहे.
सदरच्या मार्गदर्शनपर व्याख्यानाचा लाभ सात्रळ पंचक्रोशीतील सर्व ज्ञानशाखांचे विद्यार्थी – विद्यार्थिनी, पालक, शिक्षकांनी घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) प्रभाकर डोंगरे, ‘परीक्षा पे चर्चा’ उपक्रमाचे समन्वयक प्रा. सोमनाथ बोरुडे, डॉ. नवनाथ शिंदे, प्रा. आदिनाथ दरंदले यांनी केले आहे.