ओढ्याला पूर येऊन रस्ता गेला वाहून..तिघेजंण बालबाल बचावले…
विजय चिडे/पाचोड : पैठण तालुक्यातील अनेक भागात बुधवारी दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली असल्यामुळे ब्राह्मणगाव तांड्यावरील एका ओढ्याला पूर येऊन रस्ता वाहून गेल्याची घटना (दि.२२) रोजी दुपारी तिनच्या दरम्यान घडली. या पाण्याच्या प्रभावामुळे एक दुचाकी देखील वाहून गेली असून तिंघे जणं बालबाल बचालवे गेले आहे.
अधिक माहीती अशी की, ब्राम्हणगाव तांडा हे ब्राम्हणगाव ग्रामंचायत अर्तंगत येत असून या तांड्यावर जवळ पास शंभर कुंटुब राहतात. तांड्यावरील नागरिक रस्त्यासाठी त्रस्त आहे. परंतु बुधवारी दूपारी परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावताच ब्राम्हणगाव तांडा येथिल वढ्याला पूर येऊन गावाचा संपर्क तुटला. याप्रसंगी ब्राम्हणगाव तांड्याकडे येत असताना तांड्यातील एक जावई रामेश्वर गणपत आढे हे आपल्या पत्नी व मुलासोबत सासरवाडीला शाईन (MH. 21.BN.7690 ) मोटरसायकलने येत असताना अचानक वढ्याला पूर आल्याने त्यांची मोटरसायकल वाहून जाऊ लागल्याने त्यांनी सावधगिरीने गाडी सोडून आपल्या मुलाचा हात पकडून पोहत पाण्यातून बाहेर आला. दुचाकी काही अंतरावर जाऊन एका झाडाच्या झुडपात जाऊन अडकली. नागरिकांच्या सहाय्याने ती गाडी बाहेर काढली तसेच तांड्यावरील काही नागरिक बाहेर कामानिमित्त गेले असता घरी जाण्यासाठी हा एकच पर्यायी रस्ता आहे. त्या रस्त्यानेही फूल पाणी चालू असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
तांडयावरील नागरिकांनी अगोदर रस्सीच्या साह्याने जाण्याचा प्रयत्न केला पण जमत नसल्यास फोन करून ट्रॅक्टर मागवले व ट्रॅक्टरच्या साह्याने त्या नागरिकांना लहान मुलांसहित महिला व नागरिकांना बाहेर काढून तांड्या कडे जाण्यास मदत केली. त्या तांड्यातील ट्रॅक्टर चालक गोकुळ राठोड, यशवंत राठोड, संदीप राठोड ,गणेश राठोड, राजू राठोड, सत्यपाल राठोड इतर नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य केले. या रस्त्यासाठी शासनाकडे वारंवार लेखी निवेदन दिले आहे. परंतु अधिकार्याकडून फक्त आश्वासने देण्यात येत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. तरी शासनाने लवकरात लवकर हा रस्ता तयार करुन द्यावा अन्यथा गावकऱ्यांना जलसमाधी द्यावी लागेल तेव्हा तरी प्रशासन जागा होईल का? असा प्रश्न ही येथिल नागरीकांनी उपस्थित केला आहे.