अहिल्यानगर
राज्यमंत्री तनपुरेंनी दिला वरवंडीत हायमॅक्स दिवा
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : राहुरी मतदार संघाचे आमदार, राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांनी वरवंडी गावातील जामा मशीद मध्ये आज एक हायमॅक्स दिवा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुरी तालुका उपाध्यक्ष सलीमभाई शेख यांच्या हस्ते हायमॅक्स दिवा बसविण्यात आला आहे. वरवंडी जामा मशीद मुस्लीम ट्रॅस्ट कमिटीने ना. तनपुरेंचे आभार व्यक्त केले आहे.