हरेगाव येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर संपन्न
श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : हरेगाव येथील शिव मारुती मंदिराच्या प्रांगणात अग्निपंख फाउंडेशन आणि तुलसी आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन मारुती कमिटीचे अध्यक्ष अनिल भनगडे व सुनील वाकचौरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अशोक सहकारी साखर कारखान्याचे संचालक निरजभैय्या मुरकुटे आणि विरेश पाटील गलांडे यांनी शिबिराला भेट देत उपस्थित नागरिकांची विचारपूस केली. शिबिरादरम्यान, अग्निपंख फाऊंडेशनचे संस्थापक स्वप्नील पंडित यांनी फाऊंडेशनच्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली.
निरजभैय्या मुरकुटे यांनी शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांशी संवाद साधून अग्निपंख फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “अशा उपक्रमांमुळे समाजात आरोग्यविषयक जागरूकता निर्माण होत असून ग्रामीण भागातील आरोग्यसेवा अधिक सक्षम होत आहे आणि गरजू नागरिकांना त्वरित मदत मिळते. भविष्यातही अशा उपक्रमांना माझ्या शुभेच्छा आहेत.”
या शिबिरामध्ये माळेवाडी, उंदीरगाव, हरेगाव, ब्राह्मणगाव व पंचक्रोशीतील २०३ नागरिकांनी सहभाग घेतला. शिबिरादरम्यान, अनेक ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनी आणि युवक मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.