राजकीय

मा आ शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारार्थ अलकाताई शिवाजीराव कर्डिले यांचा नगर भागात झंझावाती दौरा

शिवाजीराव कर्डिले यांच्या उमेदवारीने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य

राहुरी : भारतीय जनता पार्टी महायुतीची अधिकृत उमेदवार तथा अहिल्यानगर जिल्हा बँकेचे विद्यमान चेअरमन व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारार्थ अलकाताई शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील नगर तालुक्यातील धनगरवाडी, जेऊर, ससेवाडी, बहिरवाडी, उदरमल, राखीव, आव्हाडवाडी, मजले चिंचोली, पांगरमल, खोसपुरी, इमामपूर, या गावांमध्ये झंझावती दौरा करून गावातील वाड्यावर त्यावरती सर्वसामान्य जनसामान्य वंचित तळागाळातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारार्थ नागरिकांची माय बहिणीशी भावांशी वडीलधाऱ्या नागरिकांची संवाद साधला. कर्डिले साहेबांना निवडून देण्यासाठी साद घातली.

महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव कर्डिले हे कोणते प्रस्थापित नेते नसून तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील एक विस्थापित नेता असून तो सर्वसामान्यांच्या हक्कासाठी विकास कामासाठी नेहमी झगडत असतो. याआधीही माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी मागील काळामध्ये राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात कोणतीही सत्ता नसताना स्वबळावर जनतेच्या हिताची विकासकामे केलेली आहे.

आज मतदार संघातील विकासाची काय परिस्थिती आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. कारण शिवाजीराव कर्डिले साहेबांसारखा रस्त्यावर उतरून लढाई लढणारा जनसेवक पुन्हा आपल्याला मिळणार नाही! त्यासाठी हीच योग्य वेळ आहे. तुमच्या आमच्यातील साद्या माणसाला निवडून देण्यासाठी व आपला हक्काचा भाऊ विधानसभेत पाठविण्यासाठी अलकाताई शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील नगर तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारार्थ प्रचाराचा झंजावती दौरा केला.

दरम्यान महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारार्थ अलकाताई शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरी पाथर्डी नगर विधानसभा मतदारसंघांमध्ये दौरा चालू केल्याने महिलांमध्ये अलकाताई शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारामुळे महिलांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण बघायला मिळत असून मोठ्या प्रमाणात त्यांना प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button