राजकीय

आजी-माजी आमदारांनी प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष द्यावे, योजना राबविण्यास प्रशासन सक्षम आहे – सुरेशराव लांबे पाटील

राहुरी | प्रतिनिधी – तालुक्यातील मतदारांचे विविध प्रश्न प्रलंबित ठेऊन, राहुरी मतदार संघाचे आजी- माजी आमदार व त्यांचे प्रमुख कार्यकर्ते नविन योजना राबविण्यासाठी व्हाट्सअप व पत्रकांच्या माध्यमातून योजनेचे श्रेय घेण्यासाठी चढाओढ करताना दिसत आहेत. आजी माजी आमदारांनी जनतेच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष द्यावे, योजना राबविण्यासाठी प्रशासन सक्षम असल्याचा सल्ला प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी दिला आहे.

लोकसभेच्या पराभवानंतर घाबरुन गेलेल्या महायुती सरकारने गेल्या पंधरा दिवसांपुर्वी राज्यातील बहीणींसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडली बहीण’ योजना सुरु केली. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी घातलेल्या अनेक जाचक अटीशर्तीत अनेकदा बदल करुन सरकारने बहीणींसह मेव्हन्यांची फजिती केली. मात्र, शुक्रवारी झालेल्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडाळाच्या बैठकीत अनेक अटी कमी करुन योजनेची व्याप्ती वाढुन कौटुंबिक वादाला विराम देण्यासाठी, आई-वडील आणि त्यांची दोन तिन मुले, त्यांच्या सुना, अविवाहीत मुली या सर्वांना योजनेचा लाभ देण्याचा धाडशी निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पुन्हा सत्तेत येण्यासाठी सरकार यानंतर निव्हळ बॅकेत नविन खाते उघडा व खाते नंबर द्या, ज्यांना खाते उघडणे शक्य नाही, त्यांना प्रत्येक महिन्याला रोख रक्कम घरी आणुन दिली जाईल असाही आदेश काढण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्याचाही प्रचार आजी – माजी आमदार करतील, असा टोला लांबे पाटील यांनी लगावला.

पुढे बोलताना लांबे पाटील म्हणाले की, तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना त्यावर हेतुपुरस्कर दुर्लक्ष करणारे आजी, माजी आमदारांनी आधी मुळा प्रवरा इलेक्ट्रिक संस्था, राहुरी साखर कारखाना व इतर बंद पाडलेल्या संस्था चालु करुन त्या संस्थेतील कामगारांना न्याय मिळवून द्यावा, तसेच पन्नास वर्षांपूर्वी शासनाने मुळा धरण प्रकल्प व कृषी विद्यापीठ प्रकल्प या प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या संपादीत केलेल्या जमिनीचा मोबदला त्या दानशुर पिडीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या तिसऱ्या पिढीला देऊन त्यांना त्यांच्या हक्काची नोकरी विधानसभा निवडणुकीपुर्वीच मिळवुन द्यावी, विद्यमान आमदारांचे आजोबा 1962 ते 72 ला आमदार असताना हे प्रकल्प झाले, त्यानंतर विद्यमान आमदारांचे वडील 25 वर्ष आमदार होते, त्यांची तिसरी पिढी विद्यमान आमदार मंत्री झाले, परंतु पिडित प्रकल्पग्रस्तांची तिसरी पिढी आजही हक्काच्या नोकरीसाठी आंदोलन, उपोषण करत आहे. चालु पंचवार्षीकमध्ये विद्यमान आमदार आडीच वर्षे सत्तेत मंत्री होते, माजी आमदारांचे सध्या सरकार आहे, यांनी तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य मतदारांना नेहमीच खोटी आश्वासने देऊन झुलवत ठेऊन निव्हळ राजकारणच केले असल्याचा आरोप लांबे पाटील यांनी केला.

पुढे माध्यमांशी बोलता लांबे पाटील म्हणाले, राहुरी तालुका भौगोलिक दृष्ट्या संपूर्ण महाराष्ट्रात एक नंबरचा तालुका असून या निष्क्रिय पुढाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य गोरगरीब मतदारांच्या मुलामुलींसाठी उच्च शिक्षणाची सुविधा नाही, उत्कृष्ट आरोग्यसेवा नाही, जमीन पाणी रस्ता असताना तरुणांना रोजगारासाठी राहुरी एमआयडीसी डेव्हलप नाही, नवीन उद्योग नाहीत, नागरीकांसह शाळकरी मुलांना वाडीवस्तीवर जाण्यासाठी रस्ते नाहीत, ‘धरण उशाला व कोरड घशाला’, या म्हणी प्रमाणे 26 टीएमसी चे मुळा धरण होऊन पन्नास वर्षे झाली तरी तालुक्यातील अनेक गावात नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी योजना नाही. ज्या गावांमध्ये योजना राबवली त्या विजबिलाच्या व पाणीपट्टीच्या नावाखाली अनेकदा बंद केल्या जातात, विजबिल आकारणी खाजगी सावकारा प्रमाणे केली जाते, अशा अनेक समस्यांमुळे नागरीकांना गोड व शुध्द पिण्याच्या पाण्यासाठी वनवन फिरावे लागते, या दोन्ही आजी-माजी आमदारांनी या प्रश्नांकडेच लक्ष द्यावे, नौटंकी करुन जनतेची दिशाभूल थांबवावी. तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वेळ पडल्यास यांच्या नाकर्तेपणामुळे मतदार दोघांनाही नाकारतील असा विश्वास व्यक्त करत आजी माजी आमदारांना शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी जनहिताचा सल्ला दिला आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button