अहिल्यानगर

प्रा.डॉ.सुनीता वडितके यांना राज्यस्तरीय ज्ञानज्योती पुरस्कार प्रदान

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : येथील इच्छामणी मंगल कार्यालयात आयोजित ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेतर्फे प्रा.डॉ. सुनीता वडितके यांना ज्ञानज्योती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेतर्फे एक दिवशीय ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. आमदार लहू कानडे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन पार पडले. आयोजक अर्जुन राऊत यांनी सर्व मान्यवरांचा सत्कार केला. स्वागताध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी संमेलन भूमिका आणि उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर झालेल्या पुरस्कार सोहळ्यात प्रा. डॉ. सुनीता वडितके यांना पुरस्कार सन्मानचिन्ह, शाल,बुके, प्रमाणपत्र देण्यात आले. सध्या त्या साईबाबा संस्थान, शिर्डी संचलित वरिष्ठ महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.संदीप सांगळे, प्रमुख पाहुण्या माजी सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे, प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे, स्वागताध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये, ह.भ.प.डॉ. वसंत शेंडगे, संयोजक अर्जुन राऊत, कवयित्री संगीता फासाटे, प्रा. डॉ. शरद दुधाट, ह.भ.प. दत्तात्रय बहिरट, कडा येथील संगीता होळकर/आवटे आदिंच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

त्यांच्या या यशाबद्दल श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, अधिकारी प्रज्ञा महांडुळे तसेच श्री साईबाबा महाविद्यालयाचे सर्व प्रशासकीय कर्मचारी व प्राध्यापक तसेच डॉ.सुनीता वडितके यांचे सासरे भानुदास पारखे, अंबादास पारखे, वडील सकाहरी वडितके, पती डॉ.विरेश पारखे, प्राचार्य टी.ई. शेळके, प्राचार्य डॉ. एकनाथ ढोणे आदिंनी अभिनंदन केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button