अहिल्यानगर
हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – सौ. भारती अंत्रे
सोनगाव : माजी मंत्री व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले व सौ अलकाताई कर्डिले यांच्या परिवाराच्या वतीने बुऱ्हानगर येथील निवासस्थानी राहुरी नगर पाथर्डी मतदार संघातील महिला भगिनींसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आज गुरुवार, दि. 8 रोजी आयोजित केला असून हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सोनगाव येथील सौ भारती किरण अंत्रे यांनी केले आहे.
सोनगाव सात्रळ धानोरे येथून महिलांना जाण्यायेण्याची सोय करण्यात आली असून आज सकाळी 10 वाजता जायचे आहे. ज्या महिला भगिनी येणार आहेत त्यांनी सोनगाव बसस्थानकावर उपस्थित राहावे अशी माहिती सौ. भारती अंत्रे यांनी दिली आहे.