सामाजिक

दवणगाव येथे प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने मार्गदर्शन शिबिर संपन्न

राहुरी – आज प्रहार दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग शक्ती सेवा संस्थेच्या वतीने तालुक्यातील दवणगाव येथे दिव्यांग मार्गदर्शन शिबिर व तीन चाकी सायकल वाटप कार्यक्रम संपन्न झाला.

संस्थापक अध्यक्ष तथा स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष ना. बच्चुभाऊ कडू, राज्य महासचिव रामदास खोत, ‌राज्याध्यक्ष बापूसाहेब काणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रहार दिव्यांग संघटनेचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे व जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत दवणगाव, ता. राहुरी या ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठी प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेजर भाऊसाहेब खपके हे होते.

या मार्गदर्शन शिबिरात संजय गांधी निराधार योजना, अंतोदय कार्ड योजना व शासनाच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी असणारे योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी दवणगाव येथील गोरक्षनाथ काळे यांच्या वतीने सुनील पवार यांना दिव्यांग शक्ती सेवा संस्थेच्या माणुसकीची भिंत या उपक्रमांतर्गत एक तीन चाकी सायकल देण्यात आली. तालुकाध्यक्ष योगेश लबडे व संपर्कप्रमुख रवींद्र भुजाडी यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. दवणगाव पंचक्रोशीतील एकही दिव्यांग बांधव कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही देण्यात आली.

यावेळी देवळाली प्रवरा येथील सहसचिव सुखदेव कीर्तने, दवणगावचे सरपंच भाऊसाहेब खपके, पहिलवान सुनिल खपके, दवणगावचे शाखाध्यक्ष नानासाहेब खपके, केसापूरचे शाखाध्यक्ष जालिंदर क्षीरसागर, आंबी येथील अशोक साळुंके, भरत होन, सर्जेराव होन, शाखासचिव नाथू जऱ्हाड, भारत वाणी तसेच केसापूर, आंबी, अंमळनेर, संक्रापूर या पंचक्रोशीतील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button