मातृत्वाचा प्रेरणादायी प्रवास केलेल्या दुर्गामातांचा डॉ.महांडुळे यांनी केलेला सन्मान हा स्त्रीशक्तीचा उत्सव होय – डॉ. बाबुराव उपाध्ये
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : माता, माती, देशभक्ती, संस्कृती आणि स्त्रीशक्ती या पंच घटकांची सुरक्षितता आणि महत्व युगाची हाक आहे. केडगाव येथील प्रणव हॉस्पिटलने यादृष्टीने मातृत्वाचा प्रेरणादायी प्रवास केलेल्या दुर्गामातांचा पुरस्कार देऊन केलेला सन्मान हा नवरात्रीचा पावन महिन्यातील स्त्रीशक्तीचा पुण्यउत्सव होय, असे मत रयत शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.
केडगाव येथील प्रणव हॉस्पिटल सभागृहात मीरा मेडिकल फाऊंडेशन आणि दुर्वांकुर पंचकर्म व वंधत्व निवारण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मातृत्वाचा प्रेरणादायी प्रवास केलेल्या दुर्गामातांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते. अध्यक्षस्थानी उमाकांत महांडुळे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून श्रीरामपूरचे प्रकाश किरण प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष लेविन भोसले, श्रीरामपूर सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष, पत्रकार स्वामीराज कुलथे, सोनेवाडीचे शिक्षक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष मच्छिंद्रनाथ येणारे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. दीपप्रज्वलन करण्यात आले. डॉ. प्रशांत महांडुळे यांनी स्वागत केले. डॉ.सौ. शारदा निर्मळ – महांडुळे यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांना शाल, पुष्पगुच्छ, स्वलिखित पुस्तके देऊन सत्कार केले. पाहुण्यांच्या हस्ते शाल, पुष्पगुछ, पुरस्कारचिन्ह देऊन पुणे, मुंबई, अहमदनगर, कोल्हापूर इत्यादी जिल्ह्यातून आलेल्या बारा दुर्गामातांचा सत्कार करण्यात आला.
प्रतिभा नितीन साबळे, शुभांगी सोनल पिसे, आरती गणेशानंद उपाध्ये, ज्योती राहूल चव्हाण, पूनम प्रवीण पाटील, मयुरी अविनाश आंग्रे, अक्षदा गणेश होळकर, मनीषा नामदेव कांबळे, स्नेहल प्रसाद वाघमारे, आरती सचिन राऊत, पूजा तुषार गोरे, निकिता नितीन घाणेकर यांचा परिवारासह सन्मान करण्यात आला. यावेळी मच्छिंद्रनाथ येणारे, स्वामीराज कुलथे, लेविन भोसले यांनी महांडुळे परिवाराने मूल न होणाऱ्या महिलांच्या जीवनात अपत्यप्राप्तीचे सुखाचे क्षण निर्माण केले, अनेक संसारात आनंद निर्माण केला, डॉ.सौ.शारदा निर्मळ – महांडुळे या देवदूतच होय असे उदगार काढले.
पुरस्कारप्राप्त दुर्गामातेतर्फे आरती उपाध्ये, शुंभागी पिसे, प्रतिभा साबळे, अक्षदा होळकर यांनी मनोगत व्यक्त केले. सुभाषराव देशमुख, अनिताताई देशमुख, विजयाताई भोसले, श्रद्धा कुलथे, नील कुलथे, गणेशानंद उपाध्ये, ग्रन्था उपाध्ये, संयोजक परिवार उपस्थित होते. स्त्री आरोग्य आणि आयुर्वेद विज्ञान जीवनात स्वीकारून, शाकाहारी होऊन आपले शरीर निर्मळ, रोगमुक्त ठेवावे, कुटुंबातील स्त्री समस्या आणि दुर्गामातांचे जीवन याविषयी डॉ.शारदा निर्मळ-महांडुळे यांनी विस्तृत अनुभव सांगत श्रीरामपुरातील उपाध्ये, कुलथे, भोसले, कुऱ्हे, निर्मळ परिवाराने केलेले सहकार्य आणि साहित्य निर्मिती अनुभव सांगून सर्वांचे आभार मानले. सूत्रसंचालन हरिचंद्र दळवी यांनी केले तर आभार प्रदर्शन चंद्रकांत उरमुडे यांनी केले.