राजकीय

हिरडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दरेकर

श्रीगोंदा : तालुक्याच्या पूर्व भागात सर्वच क्षेत्रात अग्रेसर असणारे हिरडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक आज पार पडली. नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी स्वर्गीय तुकाराम दरेकर गटाचे चिमाजी दरेकर यांची निवड झाली.

या निवडी दरम्यान चिमाजी दरेकर यांना पाच तर प्रतिस्पर्धी अंबादास दरेकर गटाचे संपत लक्ष्मण दरेकर यांना चार मते मिळाली. अंबादास दरेकर यांच्या गटाला गरीबांची पार्टी म्हणून सत्ता मिळायची. परंतु अलीकडे ही पार्टी गरीबांची न राहिल्याने सौ.दिपाली नाना दरेकर व सौ.विद्या रामदास बनकर या ग्रामपंचायत सदस्यांनी पार्टीला राम राम ठोकून स्वर्गीय तुकाराम दरेकर यांचे पार्टीत प्रवेश केला असल्याचे बोलले जात आहे.

या विजयासाठी सुभाष दरेकर, रामदास बनकर, मिलींद दरेकर, संतोष दरेकर, सोसायटीचे व्हा. चेअरमन कैलास दरेकर, खरेदी विक्री संघाचे संचालक भरत भुजबळ आदींसह युवा कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले तर सोसायटीचे चेअरमन झुंबरराव दरेकर, सरपंच सौ सुनिता दरेकर यांनी मार्गदर्शन केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button